शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

‘जनसंवाद’साठी काँग्रेस नेत्यांमध्ये सुसंवाद; वर्धा जिल्ह्यातील शहीद स्मारकापासून होणार यात्रेची सुरुवात

By कमलेश वानखेडे | Updated: August 22, 2023 17:02 IST

नाना पटोलेंसह सर्वच नेत्यांची उपस्थिती

नागपूर : प्रदेश काँग्रेसतर्फे ३ ते १२ सप्टेंबर दरम्यान काढण्यात येणाऱ्या ‘जनसंवाद यात्रे’च्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मंगळवारी रवीभवन येथे पूर्व विदर्भातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जवळपास सर्वच नेते गट-तट विसरून उपस्थित होते व त्यांच्यात सुसंवाद दिसून आला. नेत्यांनी यात्रेबाबत आपापल्या सूचना मांडल्या. ३ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील शहीद स्मारकापासून यात्रेची सुरुवात करण्याचा निर्णय घेत यात्रेचा पूर्व विदर्भातील मार्ग निश्चित करण्यात आला.

रविभवनातील बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सुनील केदार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. विकास ठाकरे, आ. अभिजत वंजारी, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. सहसराम कोरोटे, आ. रणजित कांबळे, अमर काळे, चारुलता टोकस, यात्रेचे नागपूर विभाग समन्वयक व प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लोंढे, किशोर गजभिये, दिलीप बनसोड, महेंद्र ब्राम्हणवाडे, अशोक धवड, डॉ. नामदेव किरसान, नामदेव उसेंडी, मोहन पंचभाई, जिया पटेल, अतुल कोटेचा, मुजीब पठाण आदी उपस्थित होते.

असा आहे कार्यक्रम

- ३ सप्टेंबर : वर्धा- ४, ५ सप्टेंबर : चंद्रपूर- ६ सप्टेंबर : गडचिरोली- ७,८ सप्टेंबर : नागपूर- ९,१०,११, १२ सप्टेंबर : भंडारा, गोंदिया

जनसंवाद यात्रेची वैशिष्टे

- भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही पदयात्रा काढाली जाईल.- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सहाही जिल्ह्यातील पदयात्रेत सहभागी होतील.- स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येत विधानसभेत ही यात्रा फिरेल.- यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्ते लोकांशी संवाद साधतील.- प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात येणारे पत्रक घरोघरी पोहचविले जाईल.- प्रत्येक जिल्ह्यातील समस्या वेववेगळ्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रक जिल्हा स्तरावरही काढले जाईल.

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेVidarbhaविदर्भnagpurनागपूर