शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे मूल्यांकन संकटात

By admin | Updated: March 5, 2015 01:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या

शिक्षक संघटनांचा असहकार आंदोलनाचा इशारा : दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासणारनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच शिक्षक संघटनांनी असहकाराचे हत्यार उपसले आहे. शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांवर आठ दिवसांत निर्णय घेतला नाही तर १० मार्चपासून दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि ‘विज्युक्टा’तर्फे (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन) हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे दीर्घकालीन प्रश्न प्रलंबित असून सरकारने त्यावर तोडगा काढलेला नाही. मागील वर्षीदेखील याच मागण्यांवरून संघटनेने पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार घातला होता. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना याबाबत वारंवर पत्रं पाठविण्यात आली, परंतु त्यांनी संघटनांना साधे चर्चेसाठीदेखील बोलाविले नाही. त्यामुळे बहिष्कार न घालता असहकार पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने आठ दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, अशी माहिती ‘विज्युक्टा’चे महासचिव अशोक गव्हाणकर यांनी दिली. शासनाची यासंदर्भात नेमकी भूमिका काय असेल, याबाबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कसा बसेल फटका?बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून पेपर तपासणीची प्रक्रियादेखील सुरू आहे. एका शिक्षकाला १० दिवसांत साधारणत: २५० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करावे लागते. नागपूर विभागात ‘विज्युक्टा’शी संबंधित साधारणत: दीड हजार मूल्यांकन करणारे शिक्षक आहेत. मागण्या मान्य न झाल्यास १० मार्चपासून एक शिक्षक दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासेल, असा इशारा देण्यात आला आहे. अशास्थितीत १० दिवसांत तो केवळ १० उत्तरपत्रिका तपासेल; म्हणजेच सुमारे २४० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडेल. संपूर्ण राज्यभरात संघटनांशी संबंधित शिक्षकांचा आकडा ३० हजारांहून अधिक आहे. अशास्थितीत जर असहकार कायम राहिला तर मूल्यांकनाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते व निकालांवर याचा परिणाम होऊ शकतो.