शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हरदोली पेपर मिलला भीषण आग

By admin | Updated: May 24, 2015 02:58 IST

काटोल तालुक्यातील कोंढाळीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या हरदोली पेपर मिलच्या आवारात ठेवलेल्या खरड्यांनी अचानक शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पेट घेतला.

कोंढाळी : काटोल तालुक्यातील कोंढाळीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या हरदोली पेपर मिलच्या आवारात ठेवलेल्या खरड्यांनी अचानक शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पेट घेतला. यात अंदाजे १३०० टन खरड्यांची राख झाली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी, तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मिलचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार लाखोटिया यांनी सांगितले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्ण नियंत्रणात आली नव्हती. कोंढाळी - नागपूर महामार्गावरील या पेपर मिलमध्ये ‘क्रॉफ्ट’ पेपरचे उत्पादन केले जाते. येथे रोज १०० टन क्राफ्ट पेपरचे उत्पादन केले जात असून, ही कंपनी क्राफ्ट पेपरसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका, युरोप व आखाती देशांमधून आयात करते. ही कंपनी कच्चा माल देशांतर्गत बाजारातून १३ रुपये प्रतिकिलो आणि परदेशातून १७ रुपये प्रतिकिलो खरेदी करते. येथे खरड्यांचा ‘पल्प’ तयार करू न त्यापासून क्रॉफ्ट पेपर तयार केला जातो. शनिवारी सकाळी या मिलमध्ये नेहमीप्रमाणे उत्पादन सुरू असताना बॉयलरमागे ठेवण्यात आलेल्या कच्च्या मालाच्या ढिगाऱ्याने पेट घेतला. पाहता-पाहता ही आग पसरत गेली. खरड्यांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच कामगारांमध्ये धावपळ सुरू झाली. माहिती मिळताच कोंढाळीचे ठाणेदार प्रदीप लांबट यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. शिवाय, पोलीस नियंत्रण कक्षालाही सूचना देण्यात आली. दुपारी १२ वजताच्या सुमारास याच परिसरात असलेल्या बाजारगाव शिवारातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच लगेच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार, काटोल व नरखेड नगर परिषद आणि अ‍ॅटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रत्येकी एका वाहनाला पाचारण करण्यात आले. एवढेच नव्हे तर कोंढाळीतील दोन टँकरही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास अथक प्रयत्न करूनही ही आग पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही. आग विझविण्यासाठी किशोर रेवतकर, बबलू भुरे, राजू बुटे, नसिर, वसंता बालपांडे या तरुणांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. (वार्ताहर)