पत्नी माहेरी गेल्यामुळे घेतली फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:49+5:302021-06-24T04:07:49+5:30

नागपूर : पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेल्यामुळे उच्च न्यायालयातील लिपिकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सक्करदराच्या रघुजीनगर क्वाॅर्टरमध्ये ...

Hanged by his wife Maheri | पत्नी माहेरी गेल्यामुळे घेतली फाशी

पत्नी माहेरी गेल्यामुळे घेतली फाशी

नागपूर : पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेल्यामुळे उच्च न्यायालयातील लिपिकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सक्करदराच्या रघुजीनगर क्वाॅर्टरमध्ये घडली. रवी प्रकाश सिडाम (३५) असे मृताचे नाव आहे. तो उच्च न्यायालयात लिपीक होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन महिन्याची मुलगी आहे. रवीची पत्नी महिनाभरापूर्वी मुलीला घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे रवी दु:खी होता. त्याने मंगळवारी सायंकाळी गळफास घेतला. त्याची माहिती मिळताच सक्करदरा पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांना रवीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात मला माफ करा, मला मुलीची आठवण येत आहे. तिच्या शिवाय मी राहू शकत नाही. मला खूप लोकांनी दारु पिऊ नकोस म्हणून समजावले, असे लिहिलेले आहे. सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

.............

Web Title: Hanged by his wife Maheri