शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपी महिलेला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 8:35 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : सात वर्षांचा कारावास कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्क        नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीची ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.पद्मा अरुण ठवरे (४४) असे आरोपीचे नाव असून ती टेका नाका, पाचपावली येथील रहिवासी आहे. १४ जुलै २०१७ रोजी तिने भाऊराव मेश्राम यांच्या सुशांत स्टिल सेंटरमधून ३०० रुपयांची भांडी खरेदी केली व मेश्राम यांना २००० रुपयाची नोट दिली. मेश्राम यांना त्या नोटेवर संशय आला. त्यामुळे त्यांनी महिलेला ओळख विचारली व पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच मेश्राम यांच्या दुकानात पोहचून पद्माची झडती घेतली असता तिच्याकडे २००० रुपयाच्या आणखी तीन बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणात ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सत्र न्यायालयाने पद्माला ७ वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने तिचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर