शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

विदर्भातील साडेसात हजार वीज चोरांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 8:05 PM

वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणकडून मागील १० महिन्यापासून आक्रमकपणे मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ७५५७ वीज चोरांच्या विरोधात कारवाई करून त्यांंच्याकडून १६ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वीज देयकासह वसूल करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर  , गोंदिया, अकोला आणि अमरावती परिमंडळात ३१३ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदहा महिन्यात १६ कोटी रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस३०३ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल, १३ दशलक्ष युनिटची वीज चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणकडून मागील १० महिन्यापासून आक्रमकपणे मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ७५५७ वीज चोरांच्या विरोधात कारवाई करून त्यांंच्याकडून १६ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वीज देयकासह वसूल करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर  , गोंदिया, अकोला आणि अमरावती परिमंडळात ३१३ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एप्रिल- २०१८ ते जानेवारी- २०१९ या कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यात वीज चोरांच्या विरोधात महावितरणकडून ही मोहीम राबविण्यात आली. यात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १४७ गुन्हे वीज चोरांच्या विरोधात दाखल करण्यात आले. नागपूर परिमंडळात ७१ गुन्हे दाखल करण्यात आले.बुलडाणा जिल्ह्यात ३४, गोंदिया जिल्ह्यात १०, भंडारा जिल्ह्यात १३, वाशीम जिल्ह्यात ३, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात १६ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विदर्भात ६ हजार ८९२ ठिकाणी वीज मीटरमध्ये फेरफारीच्या घटना उघडकीस आल्या. यात सर्वाधिक १५९६ घटना नागपूर जिल्ह्यात, यवतमाळ जिल्ह्यात ८४५ घटना तर सर्वात कमी २६० घटना गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आल्या. १० महिन्याच्या कालावधीत वीज चोरट्यांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून १३ दशलक्ष युनिटची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. महावितरणने वीज चोरांकडून देयकाची रक्कम आणि शुल्कापोटी १४ कोटी ८५ लाख रुपये वसूल केले. अकोला जिल्ह्यात वीज मीटरमध्ये फेरफारच्या ८३५ घटना, बुलडाणा जिल्ह्यात ५८८ घटना, अमरावती जिल्ह्यात ६३६, चंद्रपूर जिल्ह्यात ३४५, भंडारा जिल्ह्यात ३१८, गोंदिया जिल्ह्यात ४०९, नागपूर शहरात २७९, वर्धा जिल्ह्यात ५२२ घटना उघडकीस आल्या.वीज वापरातील अनियमितता यात देखील विदर्भात ६६५ घटना उघडकीस आल्या. यात वीज चोरट्यांनी सुमारे दीड लाख युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. यात सर्वाधिक ९४ घटना अमरावती जिल्ह्यात, त्या खालोखाल नागपूर जिल्ह्यात ९० घटना आढळल्या. सर्वात कमी १४ घटना वाशीम जिल्ह्यात त्या खालोखाल २४ घटना गोंदिया जिल्ह्यात आढळून आल्या . अकोला जिल्ह्यात ६५, बुलडाणा जिल्ह्यात ३३, यवतमाळ जिल्ह्यात ६०, गडचिरोली जिल्ह्यात ४४,भंडारा जिल्ह्यात ३०, चंद्रपूरमध्ये ७० , नागपूर शहरात ६८,वर्धा जिल्ह्यात ७३ घटना आढळून आल्या.आणखी व्यापक मोहीम राबवणारवीज मीटरमधील फेरफाराच्या घटनेची महावितरण प्रशासनाकडून गंभीरपणे दाखल घेण्यात येत असून येणाऱ्या काळात संपूर्ण विदर्भात वीज चोरीला आळा घालण्यासाठी व्यापक मोहीम राबवल्या जाणार असून तसे निर्देश महावितरणच्या परिमंडळ कार्यालयांना देण्यात आले आहेत.दिलीप घुगलप्रभारी प्रादेशिक संचालक, नागपूर परिक्षेत्र

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणtheftचोरी