शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयात होणार हेअर ट्रान्सप्लांट; सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात होईल उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:26 IST

Nagpur : केस गळतीमुळे त्रस्त असलेल्या आणि खासगी रुग्णालयांचा हजारो रुपयांचा खर्च न पेलवणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केस गळतीमुळे त्रस्त असलेल्या आणि खासगी रुग्णालयांचा हजारो रुपयांचा खर्च न पेलवणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अत्यंत माफक दरात 'केस प्रत्यारोपण' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'मेयो'च्या त्वचारोग विभागाने हा पुढाकार घेतला आहे.

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केस गळणे, ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर होतो. यावर 'केस प्रत्यारोपण' हाच सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय मानला जातो. 'मेयो 'मध्ये सुरू करण्यात आलेली ही नवी सेवा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिली जात आहे.

'एफयुइ' तंत्रज्ञानाचा वापर

त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. धर्मेंद्र मिश्रा यांनी सांगितले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात केस प्रत्यारोपण सुरू करण्यात आले. यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था आहे. 'एफयुइ' या प्रगत आणि वेदनारहित तंत्रज्ञानाचा वापर केस प्रत्यारोपणासाठी केला जात आहे.मध्य भारतातील शासकीय रुग्णालयांमध्ये 'डर्मेटो सर्जरी' सुरू करणारेही 'नागपूर मेयो' हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे.

सुरक्षितता अचूकतेला प्राधान्य

  • डॉ. मिश्रा यांनी या सुविधेबद्दल माहिती देताना सांगितले की, केस प्रत्यारोपणामध्ये रुग्णाची सुरक्षितता, स्वच्छता आणि अचूकता यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.
  • प्रशिक्षित डॉक्टरांची टीम आणि आधुनिक उपकरणांमुळे रुग्णांना उत्कृष्ट व समाधानकारक सेवा मिळत आहे. भविष्यात सोयीसुविधा जसजशा वाढतील, तसतशी रुग्णांची संख्याही वाढवली जाईल.

 

"आतापर्यंत चार रुग्णांवर यशस्वीपणे केस प्रत्यारोपण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च लागणाऱ्या या सुविधेचा लाभ आता सामान्य रुग्णांनाही घेता येईल. भविष्यात अशा प्रकारच्या आधुनिक सुविधा अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत."- डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता, मेयो

English
हिंदी सारांश
Web Title : Hair Transplant Now Affordable at Government Hospital in Nagpur

Web Summary : Nagpur's Indira Gandhi Government Medical College (Mayo) offers affordable hair transplants, a first in Maharashtra. Using advanced FUE technology, the dermatology department provides this service, addressing hair loss with a safe, precise, and cost-effective solution. Four successful transplants have already been performed.
टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीnagpurनागपूर