शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

गटारगंगा अशी की तुळशीबागेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

गटारगंगा अशी की तुळशीबागेत नाकाला रुमाल लागतोच! नाग पुनरुज्जीवन परिक्रमा : जगनाडे चौक ते हिवरीनगर गणेश हूड/ लोकमत न्यूज ...

गटारगंगा अशी की तुळशीबागेत

नाकाला रुमाल लागतोच!

नाग पुनरुज्जीवन परिक्रमा : जगनाडे चौक ते हिवरीनगर

गणेश हूड/ लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भोसले काळात शुक्रवारी परिसराला थडगा नाग म्हणत. पहिले, दुसरे आणि तिसरे रघुजी यांच्या याच परिसरात समाध्या आहेत. दुसऱ्या रघुजींचे पुत्र परमेजी यांची पत्नी काशीबाई सती गेल्यामुळे इथल्या एका देवळाला काशीबाईचे देऊळ म्हणतात. राजघराण्याने नाग नदी व समाधी स्थळांचे पावित्र्य जपले. आज मात्र नाग नदीची गटारगंगा बघून काशीबाईंचा आत्मा अशांत तर नसेल, असा विचार प्रत्येकाला अस्वस्थ करून जातो.

दुसऱ्या रघुजी भोसलेंनी नाग नदीच्या काठी तुळशीबागेतच राजवाडा, नाट्यगृह आणि इतर इमारती बांधल्या. या राजवाड्यातच ते दुपारच्या विश्रांतीसाठी येत असत. दिवाळीत नाग नदीच्या तीरावर रोषणाई करण्यात येई. ती पाहण्यासाठी सबंध शहर जमा होत असे. आता मात्र विश्रांती तर सोडा, नदीकाठावर वास्तव्यास असलेल्यांना हवेची झुळूक आली की, नाग नदीच्या गटारगंगेमुळे हवेमुळे तुळशीबागेत नाकावर रुमाल ठेवावा लागतो.

नाग नदीच्या काठी डाव्या तीरावर शुक्रवारी पेठ विभागली गेली होती. एका विस्तृत आवारात भोसले घराण्यातील व्यक्तींसाठी एक स्मशानभूमी राखून ठेवलेली होती. त्या आवारात उत्कृष्ट शिल्पकलेने युक्त अशी भोसल्यांची समाधी मंदिरे आहेत. पुनरुज्जीवनानंतर भलेही नाग नदीला गतवैभव मिळणार नाही; परंतु नदीपात्रातील दुर्गंधी तर दूर होईल.

.....

नदीकाठावर बांधकामे करण्यात सरकारी यंत्रणाही

नाग नदीच्या उगमापासून थोडे पुढे गेले की घाणीचे साम्राज्य आहेच. त्याशिवाय नदीच्या काठावर बांधकामे झाली आहेत. यात सरकारी यंत्रणाही मागे नाहीत. जगनाडे चौकात नासुप्रने उभारलेल्या पार्किंग प्लाझाचे बांधकाम नदीकाठावर केले आहे. बाजूलाच गंगाबाई घाट, नदीकाठावर झोपडपट्टी आहे. आता पक्की घरे झाली आहेत. पुढे के.डी.के. कॉलेजलगतचा परिसर, शास्त्रीनगर, हिवरीनगर, देशपांडे ले-आऊट, व्यंकटेश सिटी, लोकजीवन नगर, बगडगंज, कुंभार टोलीचा, देशपांडे ले-आऊट, जुना स्लमचा भाग आहे. या वस्त्या नदीकाठावर वसलेल्या आहेत. नदीच्या दोन्ही काठांवरील वस्त्यांना जोडण्यासाठी नदीवर पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांची उंची कमी आहे. हिवरीनगर येथील नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बाजूने जलवाहिनी गेल्या आहेत. पुलाच्या दुसऱ्या बाजूला वेस्ट वॉटर लाईन गेली आहे. बाजूलाच नदीकाठावर गार्डन आहे.

......

कॉलनीतील सिवरेज नदीत

व्यंटकेश सिटी, नंदनवन झोपडपट्टी व आजूबाजूला असलेल्या वसाहतींनी सिवरेजची योग्य प्रकारे विल्हेवाट लावलेली नाही. या वसाहतीमधील सिवरेज थेट नदीपात्रात सोडले जाते. परिसरातील झोपडपट्ट्यांत सिवरेज लाईनची यंत्रणा नसल्याने सिवरेज थेट नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होण्यासोबतच लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.