शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा दीड कोटी भरण्याचे हमीपत्र

By admin | Updated: January 12, 2016 02:48 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या फसवेगिरीला सहाय्य केल्याप्रकरणी ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांना ..

न्यायालय : अविनाश भुते यांना सशर्त जामीननागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या फसवेगिरीला सहाय्य केल्याप्रकरणी ताजश्री समूहाचे सर्वेसर्वा अविनाश रमेश भुते यांना सोमवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने एक लाखाच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली. जामीन आदेशात बऱ्याच शर्ती आहेत. भुते यांनी दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत दीड कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे लेखी हमीपत्र दिले आहे. दिलेल्या मुदतीमध्ये रक्कम भरण्यास कसूर केल्यास भुते यांचा जामीन आपोआप रद्द होईल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. प्रशांत वासनकर, विनय वासनकर, भाग्यश्री वासनकर, मिथिला वासनकर, अभिजित चौधरी आणि सरला वासनकर या सर्व आरोपींनी लबाडीने १६ मार्च २०१३ ते २२ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात ९ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसमार्फत जमा केले होते. या रकमेच्या वसुलीसाठी २९ आॅगस्ट २०१५ रोजी गुन्हे शाखेच्या आर्थिक पथकाने भुते यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घातल्या असता त्यांनी ९ कोटी १९ लाखांची रक्कम आपल्या खात्यात आल्याची कबुली देऊन तपास यंत्रणेला पैसे भरण्याची मुदत मागितली होती. घूमजाव करीत ही रक्कम आपण वासनकर कंपनीकडे केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्याची असल्याचे भुते यांनी सांगितले होते. जमा केलेल्या ३ कोटींचे आपणास ८ कोटी रुपये आणि २०१५ पर्यंत ११ कोटी रुपये मिळणार होते, असेही त्यांनी सांगितले होते. या व्यवहाराशी संबंधित कोणतेही पुरावे त्यांच्याजवळ नव्हते.भुते यांना एकूण १४ कोटी २६ लाख ३६ हजार ३०० रुपये भरावयाचे आहेत. त्यापैकी २ कोटी रुपये त्यांनी ६ जानेवारी रोजीच भरले आहेत. भुते यांनी दर महिन्याला दीड कोटी रुपये भरण्याबरोबरच हिंगणा येथील जमिनीची विक्री झाल्यास संपूर्ण रक्कम भरण्याची हमी दिली आहे. जामीन आदेशातील शर्तीनुसार भुते यांना प्रत्येक बुधवार व गुरुवारी आर्थिक गुन्हे कार्यालयात पुढील आदेशापर्यंत हजेरी द्यावी लागेल. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे, गुंतवणूकदारांच्या वतीने अ‍ॅड. बी. एम. करडे, अ‍ॅड. मोहन अरमरकर, आरोपीच्यावतीने अ‍ॅड. अक्षय नाईक, अ‍ॅड. प्रकाश रणदिवे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)