शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजपथ गाजविणाऱ्या कलावंतांचे भावपूर्ण स्वागत

By admin | Updated: January 31, 2015 02:20 IST

शहराच्या शिरपेचात यंदाच्या गणतंत्र दिन परेडमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूरकर कलावंतांनी सादर केलेल्या ‘लेझिम पथकाला’ राष्ट्रीय ...

नागपूर : शहराच्या शिरपेचात यंदाच्या गणतंत्र दिन परेडमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूरकर कलावंतांनी सादर केलेल्या ‘लेझिम पथकाला’ राष्ट्रीय स्तरावरील प्रोत्साहन पुरस्कार मिळाल्याने नागपूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरातील विद्यार्थ्यांनी राजपथावर आर. डी. परेडमध्ये सादर केलेल्या या लेझिम नृत्याने देशवासीयांची मने जिंकली. आज हे सारेच कलावंत नागपुरात परतले. याप्रसंगी नागपूरकरांनी भारतमातेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून टाकला आणि पुष्पहार, पुष्पगुच्छ देत या सर्व यशस्वी शालेय विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गोडवाना एक्स्प्रेसने या कलावंतांचे नागपुरातील मुख्य रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आगमन झाले. यात एकूण १६० कलावंतांचा सहभाग होता. याशिवाय २० शाळांचे शिक्षकही या समूहात सहभागी होते. राजपथावर सादरीकरण करण्यासाठी गेलेल्या १६० विद्यार्थ्यांत एकूण ८७ मुली आणि ७३ मुले होते. आज हे सारेच कलावंत महिनाभरानंतर दिल्लीहून परत येणार असल्याने सारेच त्यांना पाहण्यासाठी उत्सुक होते. विद्यार्थ्यांच्या पालकांसह, त्यांचे भाऊ-बहीण आणि नातेवाईंकांनी यावेळी प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकावर केली. प्लॅटफार्म क्रमांक सहावर तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. अनेक लोक रेल्वे स्थानकासमोरही पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. गोंडवाना एक्स्प्रेसचे आगमन झाल्यावर उत्स्फूर्तपणे भारत की माता की जय च्या घोषणा देण्यात आल्यात. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे वातावरणच बदलले. प्रत्येकाच्या हातात पुष्पहार आणि पुष्पगुच्छ असल्याने इतर प्रवाशांमध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले. या रेल्वेगाडीने कुणी मोठा नेता येणार आहे का, अशी विचारणा लोक परस्परांजवळ करीत होते. पण राजपथावर सादरीकरण करणारे यशस्वी विद्यार्थी येणार आहेत, हे कळल्यावर प्रत्येकालाच त्याचा अभिमान वाटत होता. गाडी आली आणि विद्यार्थी प्लॅटफॉर्मवर उतरत असताना पालक आणि नातेवाईंकानी एकच जल्लोष करीत या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागताने सारेच भारावले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गळ्यात पुष्पहार होता त्यामुळे अख्खे वातावरणच फुलांनी भारले गेले. हा नागपूरकरांच्या आयुष्यातला खरेच सुवर्णक्षण होता. नागपूरच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवणाऱ्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी दिल्लीतील अनुभवाबाबत प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आपले अनुभव लोकमतजवळ शेअर केले. (प्रतिनिधी)