शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा मुंडा यांना अभिवादन

By admin | Updated: November 16, 2015 03:06 IST

आदिवासी समाजासह विविध संघटनांच्यावतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

नागपूर : आदिवासी समाजासह विविध संघटनांच्यावतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त शहरात ठिकठिकाणी रॅली, परिसंवाद आणि मेळावे आयोजित करण्यात आले होते. आरक्षण समर्थनार्थ रॅली अनुसूचित जाती जनजाती संघटनांच्या अखिल भारतीय परिसंघ, बिरसा मुंडा युथ फोर्स व गोंडवाना युथ फोर्सच्या संयुक्त विद्यमाने आरक्षणाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. आदिवासीनगर बोरगाव येथून रॅलीला सुरुवात झाली. गिट्टीखदान चौक, केटीनगर, सुरेंद्रगड, फ्रेण्डस् कॉलनी, काटोल रोड, मकरधोकडा, प्रेरणानगर, हजारीपहाड, व्हेटरनरी कॉलेजमार्गे फुटाळा तलावाजवळील बिरसा मुंडा पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत खा. उदित राज, माया इवनाते, वासुदेवशहा टेकाम, सरस्वती सलामे, चिंतामण इवनाते, अमित कावे, प्रभुलाल परतेकी, डॉ. दिलीप कुमरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडिजिनस पीपल्स बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडिजिनस पीपल्सतर्फे मॉरिस कॉलेज ग्राऊंड धंतोली येथे आदिवासी मूलनिवासी अधिकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रा. ग्लँड सन डुंगडुंग, प्रा. गंगासहाय मीणा, अ‍ॅड. मनोज गोरकेला. प्रा. एस.के. विश्वास, कादुराम काका, राजू पांदरा, शशी सोनवणे, सतीश पेंदाम यांनी मार्गदर्शन केले. आदिम साहित्य संगीती बिरसा मुंडा यांच्या जयंतीमित्त आदिम साहित्य संगीतीतर्फे संविधान सभागृह आॅरेंजनगर खरबी चौक येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. मंगलमूर्ती सोनकुसरे, रमेश बिजेकर, प्रकाश दुलेवाले, राधिका हेडाऊ, हरिदास बेलेकर आदींनी मार्गदर्शन केले. आदिवासी क्रांतिकारी संघटना आदिवासी क्रांतिकारी संघटनेतर्फे बिरसा मुंडानगर सुभाषनगर येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम, नामदेव कार्लेकर, डी.व्ही. जोशी, हरिराम मडावी, जितेंद्र धरुआ, शिवाजीराव गायकवाड, निरंजन नासरी प्रामुख्याने उपस्थित होते.अखिल भारतीय परिसंघ अनुसूचित जाती, जनजाती संघटनांचे अखिल भारतीय परिसंघातर्फे शिक्षक सहकारी बँक सभागृह गांधीसागर येथे आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेला परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. उदित राज यांनी मार्गदर्शन केले. बहुउद्देशीय गोंडवाना संस्था बहुउद्देशीय गोंडवाना संस्थेतर्फे फुटाळा तलावाजवळील बिरस मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजेश परतेकी, हरी यादव, कमलेश मसराम, अजय कुमरे, गणेश मरसकोल्हे, सारंग कुमरे, अभिजित कुमरे, मीरा मसराम, मुकेश आत्राम उपस्थित होते. नारायणसिंह उईके गोंडवाना सेवा समिती नारायणसिंह उईके गोंडवाना सेवा समितीतर्फे सुभाषनगर येथे जयंती साजरी केली. विकास तुमडाम अध्यक्षस्थानी राहतील. (प्रतिनिधी)