शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शहराबाहेर नाही जाणार ग्रीनबस

By admin | Updated: May 23, 2015 02:46 IST

पथदर्शी प्रकल्प म्हणून इथेनॉलवर धावणारी ग्रीनबस शहरात चालविण्याचा महापालिकेसोबत करार करण्यात आला होता. परंतु मागील सहापैकी अडीच महिने ही बस शहराबाहेर होती.

नवीन करारात अट : सहा महिन्यात अडीच महिने बस शहराबाहेर नागपूर : पथदर्शी प्रकल्प म्हणून इथेनॉलवर धावणारी ग्रीनबस शहरात चालविण्याचा महापालिकेसोबत करार करण्यात आला होता. परंतु मागील सहापैकी अडीच महिने ही बस शहराबाहेर होती. त्यामुळे स्कॅनिया कंपनीने पुन्हा ही बस सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याची अनुमती मागितली होती. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही अनुमती दिली अहे. परंतु सोबतच नवीन करारात अट समाविष्ट केल्याने आता ग्रीनबस शहराबाहेर जाणार नाही.१० ते १९ फेब्रुवारी २०१५ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लखनौ येथे इथेनॉल बस चाचणीसाठी मागितली होती. त्यानंतर ९ मार्च ते १५ मे २०१५ या कालावधीत ही बस शहराबाहेरच होती. ही बस बंगरूळ, अहमदाबाद व मुंबई शहरात होती. त्यानंतर ही बस नागपुरात परतली. अडीच महिने ही बस शहराबाहेर असल्याने प्रायोगिक कालावधी ठराविक कालावधीत पूर्ण करता आला नाही. त्यामुळे हर्डीकर यांनी या कंपनीला नोटीस बजावली आहे. १६ ते २१ मे दरम्यान रिझर्व्ह बँक ते खापरी दरम्यान ही बस १९२.५ कि.मी. धावली. दररोज १४ फेऱ्या होत आहेत. यासाठी १४३ लिटर इथेनॉल लागले. १.३४ लिटर इथेनॉलमध्ये ही बस १ किलोमीटर धावते. कंपनील प्रति कि.मी. १७.९२ रुपये उत्पन्न होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी याच्या प्रयत्नातून महापालिकेला पथदर्शी प्रकल्प म्हणून ही बस मिळाली मिळाली आहे. परंतु इथेनॉलचा पर्यायी इंधनात समावेश नसल्याने आरटीओ कार्यालयाच्या परवानगीसाठी या बसला काही दिवस प्रतीक्षा करावी लागली होती. (प्रतिनिधी)