शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागामुळे रखडला विकास

By admin | Updated: February 16, 2015 02:22 IST

इंग्रजांच्या काळात वनांचे राखीव, संरक्षित व झुडपी असे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा संरक्षित आणि झुडपी जंगलावर लोकांचा अधिकार होता.

नागपूर : इंग्रजांच्या काळात वनांचे राखीव, संरक्षित व झुडपी असे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा संरक्षित आणि झुडपी जंगलावर लोकांचा अधिकार होता. मात्र १९८० मध्ये नवीन वनकायदा आला, तेव्हा वनांवरील लोकांचा अधिकार काढून घेण्यात आला. १०० टक्के जंगल हे वनविभागाच्या अखत्यारीत आले. वनखात्यामुळे विदर्भातील ९० टक्के सिंचनाचे प्रकल्प रखडले. सर्वाधिक खनिज संपदा असतानाही एकही उद्योग निर्माण होऊ शकला नाही. विदर्भाच्या मागासलेपणाला वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप आमदार शोभा फडणवीस यांनी केला. जनमंचतर्फे आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात वेगळा विदर्भ कशासाठी? या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख वक्ता म्हणून शोभा फडणवीस बोलत होत्या. व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, महासचिव राजीव जगताप उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शोभा फडणवीस यांनी विदर्भाच्या क्षमतेची माहिती दिली. विदर्भावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. विदर्भाच्या विकासासाठी वेगळ्या विदर्भाची आवश्यकता पटवून दिली. राज्याच्या पर्यावरणाचा समतोल केवळ १९.९ टक्के जंगलावर आधारित आहे. हे जंगल केवळ विदर्भात आहे. १९८० मध्ये नवीन वनकायदा झाला तेव्हा राज्यात ३१ टक्के जंगल होते. २०१२-१३ मध्ये केवळ २०.२० टक्के जंगल राहिले. २०१३-१४ मध्ये जंगलाचे क्षेत्र १९.९ टक्क्यांवर आले. पुण्यातील लवासा सिटीसाठी अजित पवारांनी विना परवानगीने २० किलोमीटरचे जंगल कापले. विदर्भात जंगलामुळे अडलेल्या प्रकल्पासाठी एक इंचही जंगल कापू दिले नाही. जंगलामुळे विदर्भातील ११ सिंचन प्रकल्पाला मंजूरी मिळू शकली नाही. ऐतिहासिक मालगुजारी तलावाचा वापर जंगलामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे विदभाचे कृषी क्षेत्र अविकसित राहिले. विदर्भात १३ टक्के ओलित व ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. येथील शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे विदर्भाला आत्महत्येचा क लंक लागला आहे. गोदावरी तंटा लवादाने विदर्भाच्या वाट्याला हजारो अब्ज घनफूट पाणी उपलब्ध केले. वनविभागामुळे यातून एक थेंबही पाणी विदर्भाला मिळाले नाही. प्रदूषणाचे भूत विदर्भाच्या डोक्यावर आहे. हे सर्व मुद्दे विदर्भाच्या विकासाला मारक ठरले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले. संचालन राम आकरे व आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)