आजीचा संयम सुटला आणि उकळते पाणी ओतले ४ वर्षांच्या नातवावर.. होळीच्या दिवशी नात्याला लागले ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:34 IST2026-03-05T13:05:27+5:302026-03-05T18:34:50+5:30

Nagpur : नागपूरमध्ये होळीच्या दिवशी धक्कादायक घटना; आजीने उकळते पाणी ओतल्याने 4 वर्षीय नातू 45 टक्के भाजला

Grandmother loses patience and pours boiling water on 4-year-old grandson.. Relationship ends on Holi | आजीचा संयम सुटला आणि उकळते पाणी ओतले ४ वर्षांच्या नातवावर.. होळीच्या दिवशी नात्याला लागले ग्रहण

Grandmother loses patience and pours boiling water on 4-year-old grandson.. Relationship ends on Holi

लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी :
रंग खेळ असलेल्या चार वर्षीय बालकाने त्याच्या चुलत आजीच्या अंगावर पिचकारीने टाकला. त्यामुळे चिडलेल्या आजीने रंग त्याच्या अंगावर गरम पाणी फेकल्याने तो त्याच्यावर गंभीररीत्या भाजला. नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. ती त्याच्या आईची काकू होय. ही घटना कोराडी येथे मंगळवारी (दि. ३) सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली.

ओम हरीश वांगे, रा. खापरखेडा, ता. सावनेर असे जखमी बालकाचे नाव आहे. ओमचे वडील हरीश वेकोलिमध्ये नोकरीला असून, तो काही दिवसांपूर्वी कोराडी येथे त्याच्या आजीकडे (आईची आई) आला होता. धुळवड असल्याने घराजवळील मुले गाण्यांच्या आवाजात रंग खेळत होती. ओमनेही पिचकारी घेतली आणि त्यात रंग व पाणी भरून मुलांसोबत खेळू लागला. अंगणात होळी पेटविली असल्याने होळीच्या निखाऱ्यांवर अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवले होते. त्यातच त्याची चुलत आजी सिंधू ठाकरे ही पाणी घ्यायला अंगणात आली.

आजी दिसताच ओमने तिच्या अंगावर पिचकारीने रंग टाकला. त्यामुळे चिडलेल्या आजीने रागाच्या भरात त्याच्या अंगावर बादलीतील गरम पाणी फेकले. अंगावर गरम पाणी पडताच तो भाजला आणि वेदनेमुळे जोरात किंचाळू लागला. त्यामुळे तिने त्याच्या अंगावर पुन्हा थंड पाणी ओतले. मात्र, तोपर्यंत त्याच्या अंगाला फोडं आली होती. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्याला लगेच नागपूर हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्याची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती शहरातील खासगी डॉक्टरांनी दिली. 

व्हिडीओ क्लिप व्हायरल

रंग खेळ असलेल्या काहींनी या प्रकाराची मोबाइलमध्ये व्हिडीओ क्लिप तयार केली होती. ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरलदेखील करण्यात आली. गरम पाण्यामुळे ओमच्या कंबरेपासून खालचा भाग भाजल्याचे काहींनी सांगितले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. शेवटी कोराडी पोलिसांनी व्हिडीओ क्लिप व सीसीटीव्ही फुटेज तसेच ओमच्या आईच्या तक्रारीवरून त्या आजीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Web Title : होली पर रंग विवाद में दादी ने पोते पर उबलता पानी डाला।

Web Summary : नागपुर में, होली के रंग को लेकर विवाद में एक दादी ने अपने चार वर्षीय पोते पर उबलता पानी डाल दिया। बच्चा गंभीर रूप से झुलस गया और अस्पताल में भर्ती है। पुलिस मामले की जांच कर रही है, जिससे आक्रोश फैल गया है।

Web Title : Grandmother pours boiling water on grandson over Holi color dispute.

Web Summary : In Nagpur, a grandmother poured boiling water on her four-year-old grandson over a Holi color dispute. The child is severely burned and hospitalized. Police are investigating the incident, which sparked outrage.