शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्वात भव्य रक्तदान मोहीम, देशभरातील दिग्गजांचा मोहिमेला आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

- विजय रुपाणी, मुख्यमंत्री, गुजरात सद्यस्थितीत जग एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महामारीमुळे आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. विशेषत: ...

- विजय रुपाणी, मुख्यमंत्री, गुजरात

सद्यस्थितीत जग एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महामारीमुळे आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. विशेषत: रक्ताच्या तुटवड्यासंदर्भात जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात लोकमतने नेहमीच पुढाकार घेतला आहे. रक्ताचं नातं या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना रक्तदान करायची प्रेरणा मिळेल व राज्यभरात जागृती होईल हा विश्वास आहे.

-संजीव मेहता, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड

लोकमतने राज्यभरात रक्तदानाची महामोहीम आयोजित केली आहे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. मागील १५ महिन्यात कोरोनामुळे रक्ताचे महत्त्वदेखील लोकांना समजत आहे. कोरोना जाईल व त्यानंतर रक्तदान करू अशी प्रतीक्षा करू शकत नाही. पुढील काही आठ‌वड्यात अनेकांच्या लांबणीवर गेलेल्या शस्त्रक्रिया नियोजित असतील व त्यांना रक्ताची गरज भासेल. ही गरज नक्कीच लोकमतच्या या महायज्ञातून पूर्ण होण्यास मदत मिळेल.

- सॅम बलसारा, चेअरमन, मॅडिसन वर्ल्ड

रक्तदानासारखे जगात इतर कुठलेही दान नाही. विजय दर्डा यांच्या नेतृत्वात लोकमतने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाजातील प्रत्येकाने व विशेषत: तरुणांना यातून निश्चित प्रेरणा मिळणार आहे. या मोहिमेतून अनेक रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. या आयोजनासाठी माझ्या लोकमत समूहाला शुभेच्छा.

- आशिष भसिन, सीईओ, एपीएसी अ‍ॅन्ड चेअरमन इंडिया डेन्ट्सू

रक्तदानासारख्या अतिशय पवित्र कार्याशी लोकमतने जुळल्याची संधी दिली ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. संकटाच्या या काळात लोक केवळ विचार व चर्चा यांच्यापुरते मर्यादित असताना लोकमतने राज्यभरात रक्तदान मोहीम राबवून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. ही मोहीम निश्चितपणे यशस्वी तर होईलच, शिवाय समाज व देशाला नवीन दिशादेखील दाखवेल.

- शशी सिन्हा, सीईओ-इंडिया, आयटीजी मीडिया ब्रॅन्ड

रक्ताचं नातं ही रक्तदानाची मोहीम राबवून लोकमतने जनतेला रक्तदानासाठी हक्काचा व विश्वासाचा मंच उपलब्ध करून दिला आहे. या मोहिमेशी जास्तीत जास्त लोकांनी जुळून समाजासाठी विधायक कामात आपले योगदान दिले पाहिजे.

-हर्ष मारिवाला, चेअरमन, मॅरिको लिमिटेड