शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेशन दुकानदारांनी बंद केले धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:15 IST

शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रेशन दुकानदारांनी अचानक धान्य वितरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शनिवारी अनेक कार्डधारकांना धान्याविना परत जावे लागले. यामुळे गरीब कार्डधारकांची समस्या वाढली आहे. शहरातील स्वस्त धान्य दुकानातून ७ ऑगस्टपासून या महिन्याचे धान्य वितरण करायचे होते. यासाठी प्रशासनाद्वारे ई-पॉश मशीनही सुरू करण्यात आली आहे. या बॉयोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करीत कार्ड धारकांना धान्य वितरण करण्याचे निर्देश रेशन दुकानदारांना देण्यात आले होते. याच गोष्टीमुळे दुकानदारांनी धान्य वितरण करण्यास नकार दिला. ई-पॉश मशीनवर कार्डधारकांचा अंगठा घेण्याच्या प्रक्रियेने धान्य वितरण करण्यास नागपूर रेशन दुकानदार संघाने जाहीरपणे नकार दिला. अंगठा लावण्याच्या प्रक्रियेमुळे कार्डधारक आणि दुकानदारांना कोविड १९ चे संक्रमण होण्याचा धोका संघटनेने व्यक्त केला.प्राप्त माहितीनुसार कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या कारणाने सरकारने मार्च ते ३१ जुलै २०२० पर्यंत रेशन केंद्रावर धान्य वितरणासाठी कार्डधारकांऐवजी दुकानदारांनी अंगठे लावण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही. मात्र १ ऑगस्टपासून पुन्हा कार्डधारकांचे अंगठे लावणे आवश्यक करण्यात आले. यावर दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. राज्यात कोविड-१९ चा फैलाव वेगाने होत आहे. नागपूर शहरातही परिस्थिती विपरीत होत असून दररोज अनेक लोक संक्रमित होत आहेत. अशावेळी कार्डधारकांचे अंगठे ई-पॉश बॉयोमेट्रिक मशीनला लावून धान्य वितरण करणे घातक ठरू शकते, अशी भीती दुकानदारांनी व्यक्त केली. यामुळे कोविडचे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा नियमही प्रभावित होणार असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. अंगठा लावण्याची प्रक्रिया रद्द करा, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा दुकानदार संघटनेने दिला आहे.शहरात दोन दुकानदार संक्रमितरेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उमाशंकर अग्रवाल यांनी सांगितले, अनेकदा ग्राहकांचा हात पकडून अंगठा लावावा लागतो. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण होते. त्यामुळे कोविडचे संक्रमण पसरण्याची शक्यता असते. सरकारने दुकानदारांना कोविडसाठी विम्याचे संरक्षण दिलेले नाही. कुठलीही सुरक्षेची सुविधाही उपलब्ध नाही. अशावेळी जीव धोक्यात घालून धान्य वितरण करावे लागते. कार्डधारकांचा अंगठा घेऊन आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. दररोज कोविड-१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. शांतिनगर आणि डागा ले-आऊट येथील दोन दुकानदार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारने ग्राहकांचा अंगठा घेण्याऐवजी दुकानदारांचेच अंगठे लावण्याची प्रक्रिया पूर्ववत करावी, अन्यथा धान्य वितरण करणार नाही, असा इशारा अग्रवाल यांनी दिला.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकारShoppingखरेदी