रश्मी शुक्लांना सरकार पाठीशी घालत आहे, फोन टॅपिंगप्रकरणी विरोधकांचा फडणवीसांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 06:05 AM2022-12-23T06:05:43+5:302022-12-23T06:06:17+5:30

फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा पोलिसांचा अहवाल न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले

Govt backing Rashmi Shukla Opposition attacks devendra Fadnavis in phone tapping case | रश्मी शुक्लांना सरकार पाठीशी घालत आहे, फोन टॅपिंगप्रकरणी विरोधकांचा फडणवीसांवर हल्ला

रश्मी शुक्लांना सरकार पाठीशी घालत आहे, फोन टॅपिंगप्रकरणी विरोधकांचा फडणवीसांवर हल्ला

googlenewsNext

नागपूर : ज्येष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा पोलिसांचा अहवाल न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना पाठीशी घालण्याचा सरकार करत असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी याप्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव फेटाळून विरोधकांना जास्त बोलू न दिल्याने घोषणाबाजी करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा शुक्ला यांच्यावर आरोप आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारवर टीका करताना रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधिमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याचा आरोप केला.

आमचे सरकार असताना आम्ही कुणाचा फोन टॅप केला नव्हता; पण कारण नसताना राज्यातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, असे पवार म्हणाले; परंतु प्रश्नोत्तराचा तास पुकारून विधानसभाध्यक्षांनी कामकाज पुढे नेले. त्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षाने निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला.

Web Title: Govt backing Rashmi Shukla Opposition attacks devendra Fadnavis in phone tapping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.