शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने अंगणवाडी सेविकांच्या तोंडाला पाने पुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:55 IST

निवडणुकीच्या काळात भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात अंगणवाडी सेविकांना सुध्दा सत्ता येताच अंगणवाडी सेविकांना

अनिल देशमुख यांचा आरोप : कर्मचारी दर्जा दिलाच नाही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या काळात भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात अंगणवाडी सेविकांना सुध्दा सत्ता येताच अंगणवाडी सेविकांना कर्मचारी पदाचा दर्जा देऊन त्यांना वेतन श्रेणी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन वर्षानंतर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी त्यांना आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगण्यात येते. परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना अंगणवाडी सेविकांचे मानधन हे ५०० रुपयावरून ४०० रुपयापर्यंत करण्यात आले होते. यानंतर २०१४ मध्ये यात परत ९०० रुपये वाढ करण्यासोबत एकमुस्त निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु लागलीच विधानसभेच्या निवडणुका लागल्याने याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आमच्या पाठपुराव्यानंतर एक वर्षांनी मानधनात ९०० रुपयांनी वाढ करून निवृत्ती वेतन एकमुस्त देण्याचा निर्णय आला. अंगणवाडी सेविकांच्या प्रतिनिधीच्या दोन वेळा बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठका सुध्दा झाल्या. तरी सुध्दा यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सरकारने समितीची सुध्दा स्थापना केली होती. यात संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या समावेश होता. या समितीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या निर्णयाप्रमाणे पदोन्नती ही सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपा सरकारने पदोन्नतीसाठी केवळ शैक्षणिक पात्रता ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे अंगणवाडी सेविका प्रचंड रोष व्यक्त करीत आहे. समितीने तयार केलेल्या अहवालात अनेक बदल राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने अंगणवाडी सेविकांनी आपले आंदोलन पुकारले आहे. तरी सुध्दा त्यांच्या मागण्यांचा कोणताही विचार करण्यासाठी भाजपा सरकार तयार नाही.