नितीन गडकरींना धमकी आणि १०० कोटींची खंडणी मागण्याच्या खटल्यात सरकारने तपासले साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:49 IST2026-03-21T15:46:34+5:302026-03-21T15:49:00+5:30
Nagpur : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणी सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या कार्यवाहीला खटल्यावरील शुक्रवारपासून वकील अॅड. लीलाधर शेंदरे यांनी सुरुवात झाली.

Government examines witnesses in Nitin Gadkari threat case
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणी सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या कार्यवाहीला खटल्यावरील शुक्रवारपासून वकील अॅड. लीलाधर शेंदरे यांनी सुरुवात झाली. दरम्यान, सरकारी आरोपींविरोधात तीन साक्षीदार तपासले.
धंतोली पोलिसांनी जयेश ऊर्फ शाहीर ऊर्फ शाकीर शशिकांत पुजारी आणि अफसर पाशा उर्फ बशीरउद्दीन नूर मोहम्मद या दोन आरोपींविरोधात हा खटला दाखल केला आहे. या खटल्यावर न्यायाधीश ए. के. शर्मा यांच्यापुढे सुनावणी झाली. घटनेच्या वेळी दोन्ही आरोपी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील हिडलंगा मध्यवर्ती कारागृह होते.
तेथे पुजारीने या गुन्ह्याचा कट रचला. त्याने १४ जानेवारी व २१ मार्च २०२३ रोजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून पहिल्यावेळी १०० कोटी, तर दुसऱ्यावेळी १० कोटी रुपयाची खंडणी मागितली. तसेच, खंडणी दिली नाही तर, गडकरी यांना बॉम्बस्फोट करून ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार आहे.
धंतोली आरोपींविरोधात पोलिसांनी भादंवितील कलम ३८५, ३८७, ५०६(२) व ५०७आणि बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यातील कलम १०, १३, १८ व २० अंतर्गत एफआयआर नोंदविला आणि गुन्ह्याच्या तपासानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला.