गुजरातमधील दूध महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे षडयंत्र- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 15:33 IST2018-07-16T15:31:00+5:302018-07-16T15:33:04+5:30
सरकारच्या या अन्यायपूर्ण धोरणाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी

गुजरातमधील दूध महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे षडयंत्र- जयंत पाटील
नागपूर: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाकरिता दरवाढ न देण्यामागे सरकारचे षडयंत्र असून त्याला गुजरातच्या अमूल कंपनीचे दूध महाराष्ट्रात आणावयाचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.
सरकारच्या या अन्यायपूर्ण धोरणाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी असे आवाहन करून त्यांनी जोपर्यंत सरकार याबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.