शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

नागपूरच्या तकिया धंतोलीत गुंडांचा हैदोस : तरुणावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 11:37 PM

मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात सशस्त्र गुंडांनी प्रचंड हैदोस घातला. दोन तरुणांना घेरून त्यांनी तलवार तसेच चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. काही गुंडांनी दगडानेही ठेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली, त्यामुळे हे गुंड पळून गेले. मात्र, त्यांनी केलेल्या हल्ल्यात अनिकेत किशोर परतेकी (वय २२) तसेच त्याचा अल्पवयीन भाऊ जबर जखमी झाले. धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा थरारक प्रकार घडला.

ठळक मुद्देदगडानेही ठेचण्याचे प्रयत्न : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात सशस्त्र गुंडांनी प्रचंड हैदोस घातला. दोन तरुणांना घेरून त्यांनी तलवार तसेच चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. काही गुंडांनी दगडानेही ठेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली, त्यामुळे हे गुंड पळून गेले. मात्र, त्यांनी केलेल्या हल्ल्यात अनिकेत किशोर परतेकी (वय २२) तसेच त्याचा अल्पवयीन भाऊ जबर जखमी झाले. धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा थरारक प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेतसोबत काही दिवसांपूर्वी त्याच्याच वस्तीत राहणारा संदीप नामक गुंडासोबत वाद झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी संदीप तसेच त्याचे पाच ते सात साथीदार दारूच्या नशेत टुन्न होऊन मंगळवारी रात्री तकिया धंतोली भागात आले. एकाने अनिकेतला अंधाऱ्या ठिकाणी बोलवून नेले. शंका आल्याने अनिकेतचा लहान भाऊ अभिषेक सोबत गेला. त्याने एका मित्रालाही आवाज दिला. दरम्यान, अंधाऱ्या भागात जाताच अनिकेतला गुंडांनी घेरले. धोका लक्षात येताच अनिकेतने रस्त्यावर पळ काढला. त्याच्या मागे आलेल्या संदीप आणि त्याच्या साथीदाराने तलवारीने त्याच्यावर वार केला. संदीपने दोन्ही हाताने तलवार धरल्याने त्याच्या हाताच्या बोटांना जबर जखम झाली. दुसºया एका आरोपीने मागून चाकू मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिकेतच्या भावाने चाकू मारणाऱ्यांवर धाव घेतल्याने निसटता घाव बसला. त्यानंतर दोन्ही भावांनी तसेच त्याच्या मित्राने आरडाओरड केल्याने मोठ्या संख्येत आजूबाजूची मंडळी धावली, परिणामी आरोपी पळून गेले. धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.मोठा अनर्थ टळलापळून जाण्यापूर्वी आरोपींनी अनिकेत व त्याच्या भावाला बाजूचे दगड फेकून मारले. दरम्यान, शस्त्राचे वार बसल्याने अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला धंतोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती कळताच धंतोलीचा पोलीस ताफा रुग्णालयात पोहचला. वृत्त लिहिस्तोवर कोणत्याही आरोपीला अटक झालेली नव्हती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर