भाजी विक्रेत्याच्या घरातील १.६५ लाखाचा मुद्देमाल पळविला, गुन्हा दाखल

By दयानंद पाईकराव | Updated: March 25, 2023 15:02 IST2023-03-25T15:02:23+5:302023-03-25T15:02:41+5:30

आरोपीचा शोध सुरु

Goods worth 1.65 lakh stolen from vegetable seller's house, case registered | भाजी विक्रेत्याच्या घरातील १.६५ लाखाचा मुद्देमाल पळविला, गुन्हा दाखल

भाजी विक्रेत्याच्या घरातील १.६५ लाखाचा मुद्देमाल पळविला, गुन्हा दाखल

नागपूर : भाजी विकण्यासाठी गेलेल्या भाजी विक्रेत्याच्या घरी घरफोडी करून रोख १.५० लाख आणि दागिन्यांसह १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री ११.३० दरम्यान घडली.

सोमेश्वर वाल्मिक बावनकर (२६, श्रीवासनगर, हनुमान मंदिराजवळ, महादुला) असे भाजी विक्रेत्याचे नाव आहे. ते गुरुवारी आपल्या घराच्या दाराला कुलुप लाऊन गुरुवारी बाजार येथे भाजी विकण्यासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने सोन्याचांदीचे दागीने व रोख १ लाख ५० हजार असा एकुण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Goods worth 1.65 lakh stolen from vegetable seller's house, case registered