वर्षभरात सोनं वाढले तब्बल ५८ हजारांनी; यावर्षी किती वाढण्याची शक्यता ? दरवाढीमागील ही आहेत प्रमुख कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:34 IST2026-01-02T17:33:40+5:302026-01-02T17:34:30+5:30

Nagpur : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, गुंतवणूकदार वाढले, सर्व अंदाज खोटे ठरवले

Gold has increased by 58 thousand in a year; How much is it likely to increase this year? These are the main reasons behind the price increase | वर्षभरात सोनं वाढले तब्बल ५८ हजारांनी; यावर्षी किती वाढण्याची शक्यता ? दरवाढीमागील ही आहेत प्रमुख कारणे

Gold has increased by 58 thousand in a year; How much is it likely to increase this year? These are the main reasons behind the price increase

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वर्ष २०२५ हे भारतीय सराफा बाजाराच्या इतिहासात 'सुवर्ण अक्षरांनी' नव्हे, तर 'विक्रमी दरवाढीने' कोरले गेले. या वर्षात सोने आणि चांदीच्या किमती आकाशाला भिडल्याने आता हे धातू सर्वसामान्यांसाठी केवळ स्वप्नवत उरले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या अवघ्या १२ महिन्यांच्या कालावधीत चांदीच्या दरात तब्बल दीड लाख रुपयांची, तर सोन्यात ५८ हजार रुपयांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली. २०२५ च्या सुरुवातीला आवाक्यात वाटणारे सोने आणि चांदीने वर्षाअखेरपर्यंत सर्व अंदाज खोटे ठरवले.

दरवाढीमागील ही आहेत प्रमुख कारणे

ही वाढ केवळ स्थानिक नसून जागतिक घडामोडींचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोलर पॅनल्स, इलेक्ट्रिक वाहने आणि ५ जी तंत्रज्ञानामध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेले युद्ध आणि राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी आपला पैसा शेअर बाजारातून काढून सोन्यात गुंतवला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्याचा थेट फायदा मौल्यवान धातूंना मिळाला.

सोन्याची झेप

१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचे दर (२४ कॅरेट) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम ७६,२०० रुपये होते. वर्ष संपता संपता ३१ डिसेंबरला हाच दर ३ टक्के जीएसटीसह १,३७,७०० रुपर्यावर पोहोचला. म्हणजेच वर्षाकाठी ५८,५०० रुपयांची वाढ झाली. नवीन वर्षात सोने ४०० रुपयांनी उतरले.

चांदीचा ऐतिहासिक विक्रम

वर्षाच्या सुरुवातीला ८९,३०० रुपये प्रतिकिलो असलेली चांदी वर्षाच्या शेवटी २,३९,४०० रुपयांवर स्थिरावली. एका वर्षात दीड लाख रुपयांची दरवाढ ही आजवरची सर्वात मोठी ठरली. मात्र, नवीन वर्षात दर ३,६०० रुपयांनी कमी झाले.

१४ कॅरेट सोन्याचा पर्याय; पण सराफांची पाठ

वाढत्या किमतीमुळे दागिन्यांची विक्री घटू लागल्याने 'ब्युरो ऑफ इंडियन स्टैंडईस'ने (बीआयएस) १४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांना मान्यता दिली. कमी किमतीत दागिने उपलब्ध व्हावेत हा यामागचा हेतू होता. मात्र, सराफा व्यावसायिकांनी याला थंड प्रतिसाद दिला. १४ कॅरेटचे दागिने लोकप्रिय झाले, तर २२ आणि २४ कॅरेटच्या दागिन्यांची मागणी पूर्णपणे ठप्प होईल, तसेच १४ कॅरेट सोन्यात शुद्धता कमी असल्याने भविष्यात ते विकताना ग्राहकांना कमी परतावा मिळेल, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

सोने-चांदीचे दर (रुपये) :

दिनांक                सोने           चांदी
१ जाने.- २५      ७६,९००       ८६,७००
१ फेब्रु.-२५        ८२,४००       ९४,५००
१ मार्च-२५        ८५,३००        ९४,७००
१ एप्रिल-२५      ९१,४००        १,०१,४००
१ मे-२५           ९३,६००         ९५,२००
१ जून-२५        ९७,०००        १,००,३००
१ जुलै-२५        ९७,८००         १,०७,३००
१ ऑगस्ट-२५    ९९,५००        १,११,८००
१ सप्टें.-२५       १,०४,८००       १,२४,०००
१ ऑक्टो.-२५   १,१७,६००      १,४६,५००
१ नोव्हें.-२५      १,२१,१००       १,५०,५००
१ डिसें.-२५      १,२९,३००      १,७५,८००
३१ डिसें.-२५    १,३३,७००      २,३२,४००
१ जाने.-२६      १,३३,३००       २,२८,८००

(किमतीवर ३ टक्के जीएसटी वेगळा)

पुढील वर्षातही ही तेजी कायम राहील. जागतिक स्तरावर परिस्थिती सुधारली नाही, तर सोने २ लाखांचा टप्पा पार करू शकते आणि चांदी ३.५ लाख रुपयांकडे वाटचाल करू शकते. सोने आता खरोखरच सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेले, परंतु गुंतवणुकीसाठी आता हाच 'नवा सोन्याचा' पर्याय ठरत आहे. दरवाढीनंतरही ग्राहक सोने आणि चांदी खरेदी करणार हे नक्की.
राजेश रोकडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी).


 

Web Title : एक साल में सोना ₹58,000 बढ़ा: कारण और अनुमान

Web Summary : 2025 में, सोने में ₹58,000 और चांदी में ₹1.5 लाख की वृद्धि हुई। भू-राजनीतिक अस्थिरता और चांदी के औद्योगिक उपयोग में वृद्धि जैसे वैश्विक कारकों ने मूल्य वृद्धि को बढ़ावा दिया। विशेषज्ञों का अनुमान है कि यदि स्थितियाँ बनी रहती हैं तो और वृद्धि होगी।

Web Title : Gold prices soar by ₹58,000 in a year: Reasons & Forecast

Web Summary : In 2025, gold surged by ₹58,000 and silver by ₹1.5 lakh. Global factors, including geopolitical instability and increased industrial use of silver, fueled the price hike. Experts predict further increases if conditions persist.