सोनं-चांदी सुसाट ! अवघ्या २१ दिवसांत चांदी लाखाने महागली, तर सोन्याचाही नवा उच्चांक
By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 21, 2026 20:05 IST2026-01-21T20:04:13+5:302026-01-21T20:05:22+5:30
Nagpur : नवीन वर्ष-२०२६ च्या सुरुवातीलाच सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

Gold and silver are very expensive! Silver has become expensive by lakhs in just 21 days, while gold also hits a new high
नागपूर : नवीन वर्ष-२०२६ च्या सुरुवातीलाच सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. विशेषत: चांदीच्या दराने मोठी झेप घेतली असून, अवघ्या तीन आठवड्यांत किलो चांदी १ लाख रुपयांनी वधारली, तर २४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही २४ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. बुधवारी सोन्यात एकाच दिवसांत १० हजार आणि चांदीत तब्बल १६ हजार रुपयांची वाढ झाली.
चांदीची ऐतिहासिक झेप
१ जानेवारीला ३ टक्के जीएसटीसह २.३५ लाख रुपयांवर असलेली चांदी आज ३.३५ लाखांच्या पार गेली आहे. म्हणजेच २१ दिवसांत तब्बल १,००,२०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याने देखील १.६१ लाखांचा टप्पा ओलांडला असून, २१ दिवसांत सोन्याच्या किमतीत २४,२०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या गंगाजळीत सोन्याचा साठा वाढवत आहेत, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत आहे. बाजारातील ही तेजी पाहता, सोने आणि चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र, गुंतवणुकीसाठी हा काळ अजूनही फायदेशीर ठरू शकतो, असे काही विश्लेषकांचे मत आहे.
वर्ष २०२६ मध्ये अशी झाली दरवाढ (रुपयांत)
दिनांक सोने (१० ग्रॅम) चांदी (किलो)
१ जाने. १,३७,३०० २,३५,७००
२० जाने. १,५१,६०० ३,१९,७००
२१ जानेवारी १,६१,५०० ३,३५,९००
(किंमत ३ टक्के जीएसटीसह)