शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

आधी कोरोना जाणार की आधी व्यापारी मरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

नागपूर : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कठोर निर्बंधाच्या स्वरूपात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावले आहे. पहिल्याच दिवशी दुकाने ...

नागपूर : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कठोर निर्बंधाच्या स्वरूपात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावले आहे. पहिल्याच दिवशी दुकाने उघडायची वा नाहीत, यावर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. इतवारी या मुख्य बाजारपेठेत दुकाने उघडण्यासंदर्भात व्यापारी आणि पोलिसांमध्ये वाद होऊन काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेकडो व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध नारेबाजी केली. लॉकडाऊन लावून शासन व्यापाऱ्यांना आर्थिक संकटात टाकत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. शासनाच्या निर्णयाने आधी कोरोना जाणार की आधी व्यापारी मरणार, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

सकाळी ११ वाजता व्यापारी इतवारी मुख्य बाजारात गोळा झाले. यावेळी लगतच्या सर्वच बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी दुकाने सुरू करण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला. त्यामुळे व्यापारी चिडले आणि शासनाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. इतवारी बाजारात सोना-चांदी बाजार, भांडे बाजार, किराणा बाजार, धान्य बाजारपेठ आहे. किराणा आणि धान्य बाजार सुरू होते; पण इतवारीतील अन्य दुकानदारांनी लॉकडाऊनचा विरोध केला.

आम्ही दुकाने उघडणारच

पहिल्या दिवशी पोलिसांनी मज्जाव केला असला तरीही आम्ही दुकाने सुरू करूच, असा निर्धार व्यापाऱ्यांनी यावेळी केला. कोरोनावर नियंत्रण आणण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. दुकाने सुरू असल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही. दुकानदार कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करीत आहेत. नागरिकांनी पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग होणार नाही. कोरोना वाढीसाठी व्यापाऱ्यांना जबाबदार ठरवू नये. ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सणाच्या महिन्यात व्यापाऱ्यांनी दुकानात माल भरला आहे. ठोक व्यापाऱ्यांना चुकारे द्यायचे आहेत. अशा स्थितीत व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ शासनाने आणू नये, अशी प्रतिक्रिया शैलेश अग्रवाल यांनी दिली.

होणार कोट्यवधी रुपयांचे नुकसान

दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. बँकांचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार, विजेचे बिल, दुकानाचे भाडे आदी खर्च व्यापाऱ्यांना करावा लागताे. गेल्या वर्षी शासनाने ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना काहीही मदत केली नाही. उलट बँकांनी चक्रवाढव्याज आकारून कर्जाची वसुली केली. शिवाय आयकर रिटर्नमध्ये काहीही सूट दिली आहे. त्यानंतरही सरकारच्या व्यापाऱ्यांच्या जीवावर उठली आहे. शासनाच्या लॉकडाऊनचा निषेध करण्यात येत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

महाल बाजारात व्यापाऱ्यांचा आक्रोश

महाल बाजारात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता जवळपास २५० पेक्षा जास्त दुकाने आहेत. दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशामुळे सर्व व्यापाऱ्यांमध्ये रोष होता. व्यापाऱ्यांनी महाल चौकात एकत्रित येऊन शासनाच्या आदेशाचा निषेध आणि नारेबाजी केली. आदेश मागे घेईपर्यंत व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार विश्वास मंगलानी यांनी व्यक्त केला. शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी टिळक पुतळ्यापर्यंत रॅली काढली. याशिवाय बडकस चौक गांधी पुतळ्याजवळ व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी शेकडो व्यापारी एकत्र आले होते.