शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध धम्माचे वैभव पुन्हा परतणार

By admin | Updated: February 16, 2015 02:27 IST

तथागत गौतम बुद्धांनी दिलेला धम्म आज जगभरात पोहोचला आहे. या धम्माच्या माध्यमातून जगाने प्रगती केली आहे, परंतु भारतातच हा धम्म रसातळाला गेला.

नागपूर : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला धम्म आज जगभरात पोहोचला आहे. या धम्माच्या माध्यमातून जगाने प्रगती केली आहे, परंतु भारतातच हा धम्म रसातळाला गेला. मात्र डॉ. आंबेडकरांच्या रूपाने भारतात बौद्ध धम्माचे पुनर्जीवन झाले असून भारतात बौद्ध धम्माला असलेले गतवैभव पुन्हा प्राप्त होईल, असा विश्वास थायलंडच्या राजकुमारी मॉम लुयाँग राजादारासिरी जेयानकुरा यांनी येथे व्यक्त केले. बुद्धा स्पिरिच्युअल पार्क येथे आयोजित जागतिक धम्म परिषद आणि सिद्धार्थ गौतम या चित्रपटाच्या विमोचनासाठी त्या नागपुरात आल्या आहेत. सायंकाळी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत श्रीलंकेचे भदंत बानागला उपतिस्स नायक थेरो, सिद्धार्थ गौतम चित्रपटाचे मुख्य अभिनेते गगन मलिक हे सुद्धा उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब अ२ांबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. गौतम बुद्धांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी भदंत बानागला उपतिस्स, भदंत सदानंद महाथेरो, सदानंद फुलझेले व्यासपीठावर होते. आवाज इंडिया टीव्ही आणि डॉ. आंबेडकर स्मारक समिती यांच्यातर्फे हा संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राजकुमारी मॉम लुयाँग म्हणाल्या, भारत आणि थायलंडमधील बौद्ध धम्मगुरु एकमेकांच्या देशात येत-जात राहतात. त्यामुळे दोन्ही देशातील संस्कृतीचे आदानप्रदान होते. ही दोन्ही संस्कृतीच्या वाढीसाठी चांगली गोष्ट आहे. भारतातून बौद्ध धम्म जगभरात पसरल्याने बौद्ध राष्ट्रंमध्ये असलेल्या भारताबद्दल विशेष आकर्षण आहेत. तसेच आकर्षण थायलंडला सुद्धा आहे. थायलंडमध्ये बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी मोठे विद्यापीठ आहे. जगातील बौद्ध विद्वानांना तिथे शिकवण्यासाठी बोलाविले जाते. त्याचप्रमाणे अनेक लहान-लहान अभ्यासक्रमसुद्धा चालविले जातात. त्याचप्रकारे शैक्षणिक केंद्र भारतातही निर्माण व्हावे. तसे प्रयत्न सुरू आहेत. बौद्ध धम्माच्या शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी आपण सर्वतोपरी मदत करायलाही तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.राजकुमारी मॉम लुयाँग यांनी इंग्रजीमध्ये नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गगन मलिक यांनी त्याचे हिंदी भाषांतर केले. एस.के. गजभिये, डॉ. सुनील तलवारे, विलास गजघाटे, नितीन गजभिये, चंद्रबोधी पाटील व्यासपीठावर होते. डॉ. राजेंद्र फुले यांनी प्रास्ताविक केले. आवाज इंडियाचे संचालक अमन कांबळे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)