शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजची रक्कम आठ दिवसात शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

दुष्काळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी उघड्यावर आला आहे. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनात सात हजार कोटीच्या पॅकेजची केलेली

विदर्भ कनेक्टची मागणी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारही अपयशीनागपूर : दुष्काळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी उघड्यावर आला आहे. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनात सात हजार कोटीच्या पॅकेजची केलेली घोषणा पोकळ ठरत आहे. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न बघता येत्या आठ दिवसात संपूर्ण घोषित केलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या दारात पोहचवावी, अशी मागणी विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी केली आहे. राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतक ऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याबाबत कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. नवे सरकारही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असेल तर सरकारच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. आज ते स्वत: मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊन दोन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी एकही कल्याणकारी योजना त्यांनी आखली नाही. अधिवेशनात केलेल्या पॅकेजची घोषणाही पोकळ ठरत आहे. कापूस आणि सोयाबीनला जाहीर केलेल्या भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिक ट झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तत्परता दाखवावी, आठ दिवसात पॅकेज शेतकऱ्यांच्या दारात पोहचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना विशेष अधिकारी नेमून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामावर लावून विदर्भातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा द्यावा.(प्रतिनिधी)