शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

गर्ल्स शायनिंग

By admin | Updated: June 4, 2017 01:29 IST

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले.

‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांचे ‘सेलिब्रेशन’ : ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘सीजीपीए’ १० लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले. निकालांमध्ये यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. उपराजधानीत ‘सीबीएसई’च्या सुमारे ५० शाळा असून, यातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सुरुवातीला गुणांऐवजी ‘ग्रेड’वर आधारित निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे निकाल पाहताना पालक व विद्यार्थ्यांसोबतच शाळांमध्येदेखील संभ्रम निर्माण झाला होता. परंतु काही तासांनी शाळांकडे विद्यार्थ्यांचे गुण आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘सीजीपीए’ १० इतका आहे.‘नारायणा विद्यालयम्’च्या ईशान प्रयागी व नंदिनी चलाख यांनी ९९.४ टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर बाजी मारली असून, गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स)ची विद्यार्थिनी कनक गजभिये व बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर) येथील विद्यार्थिनी आयुषी आंबिलकर यांनी ९९.२ टक्के (४९६) गुण प्राप्त करीत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकावर ‘नारायणा विद्यालयम्’चे ऋतुजा कोलते, शिवानी पाटील, बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स)ची ऋषिका जोशी व ‘मॉडर्न स्कूल’ (कोराडी रोड) येथील अनंत सोहल हे चौघे आहेत. या चौघांनाही प्रत्येकी ९९ टक्के (४९५) गुण प्राप्त झाले.नागपुरातील ‘टॉपर्स’क्रमांकनावशाळाटक्के१ईशान प्रयागीनारायणा विद्यालयम्९९.४० %१नंदिनी चलाखनारायणा विद्यालयम्९९.४० %२कनक गजभियेभवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९९.२० %२आयुषी आंबिलकरभवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर९९.२० %३ऋतुजा कोलतेनारायणा विद्यालयम्९९ %३शिवानी पाटीलनारायणा विद्यालयम्९९ %३ऋषिका जोशीभवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९९ %३अनंत सोहलमॉडर्न स्कूल, कोराडी रोड९९ %विद्यार्थ्यांची धावपळनागपुरातील सीबीएसई शाळा चेन्नई विभागाच्या अंतर्गत येत असल्याने निकालाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. निकालाची माहिती समजताच विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये विचारपूस करण्यास सुरुवात केली . मोबाईलवर एसएमएसने निकाल पाहण्याची सुविधा नसल्याने अनेकांनी तर ‘इंटरनेट’ वर पाहण्याचा प्रयत्न केला तर बाहेरगावी असलेल्यांनी इतर मित्रांकडून निकाल काय हे माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला. ‘सीबीएसई’चे संकेतस्थळ बराच वेळ संथ सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण कळत नव्हते. ‘सीजीपीए’मध्ये विद्यार्थिनींचीच बाजीनागपुरातील ‘सीबीएसई’च्या बहुतेक सर्व शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे १० ‘सीजीपीए’ म्हणजेच सर्वोत्तम ‘ग्रेड’ असलेल्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त आहे.