नागपुरात दुसऱ्या माळ्यावरून पडून मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:16 IST2020-06-29T21:15:24+5:302020-06-29T21:16:49+5:30
सक्करदऱ्यातील एका इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून आशू गजानन खाटे (११) नावाच्या मुलीचा करुण अंत झाला.

नागपुरात दुसऱ्या माळ्यावरून पडून मुलीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदऱ्यातील एका इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून आशू गजानन खाटे (११) नावाच्या मुलीचा करुण अंत झाला.
२३ जूनच्या दुपारी २ च्या सुमारास सक्करदऱ्यातील मिरची बाजाराजवळ असलेल्या एनआयटी बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर आशू शेजारच्या मुलांसोबत पॅसेजमध्ये खेळत होती. खेळता खेळता तोल गेल्यामुळे पॅरापिटच्या भिंतीवरून ती खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला आधी खासगी आणि नंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री १०.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.