शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

फरार ठगबाजाने अनेकांना लावला कोट्यवधीचा चुुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 02:44 IST

कुख्यात सुभाष बंजाराचे नवीन कृत्य : २ हजार टॅक्सी मालकांना गंडा

जगदीश जोशी

नागपूर : टॅक्सी भाड्यावर चालवण्याचे आमिष दाखवून नागपुरात अनेकांची फसवणूक करून फरार झालेल्या सुभाष बंजाराने दिल्लीतही जवळपास दोन हजार टॅक्सी मालकांना कोट्यवधीचा चुना लावला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात साडेपाच महिन्यांपासून फरार असूनही पोलीस त्याला शोधण्यासाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत नाहीत. यामुळेच बंजारा चार महिन्यांतच दिल्लीतूनही कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला. हा प्रकार उघडकीस येताच शहरातील पीडितही संताप व्यक्त करत आहेत.

बंजारपा मूळचा जळगावचा आहे. त्याने कोरोना संसर्गादरम्यान एलआयसी चौकाजवळ कुक टॅक्सी ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली होती. टॅक्सी मालकांना त्याच्याशी जुळल्यास टॅक्सीच्या मोबदल्यात दर महिन्याला एक ठरावीक रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. रजिस्ट्रेशनच्या नावावर शहरात ७५०० आणि शहराबाहेरसाठी १७,५०० रुपये घेतले होते. जुलैमध्ये टॅक्सी सर्व्हिस सुरू केली. ऑगस्टमध्ये रोख रक्कम अदा केली; परंतु सप्टेंबरमध्ये धनादेश दिले. त्यानंतर ते धनादेश बाऊन्स झाल्यावर तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिनेश मिश्रा यांच्या तक्रारीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सूत्रानुसार तपासात जवळपास ४५० टॅक्सी मालकांकडून ४.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी २५० पेक्षा अधिक लोकांची साक्षही नोंदवून घेतली.

नागपुरातून फरार झाल्यानंतर बंजारा मुंबई मार्गे दिल्लीत पोहोचला. दिल्लीच्या वजीरपूर येथे नेताजी सुभाष पॅलेस येथे त्याने योयो टॅक्सी सर्व्हिस सुरू केली. तिथेही त्याने नागपूरच्या धर्तीवर टॅक्सी मालकांना आपल्या जाळ्यात अडकविले. डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत २ हजार टॅक्सी मालक बंजाराच्या योयो सर्व्हिसशी जुळले. त्याने ६५ ते ३५ हजार रुपये रजिस्ट्रेशनच्या नावावर घेतले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. टॅक्सी मालकांनी वजीरपूर ठाण्यात, डीसीपी आणि ईडीकडे त्याची तक्रार केली. 

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह   बंजारा नागपुरातील एका पीडित टॅक्सी मालकाची कार घेऊन फरार झाला होता. त्या कारला ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत दंड झाला. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी दिल्लीतील काश्मिरी गेट, ८ डिसेंबर रोजी वजिराबाद आणि १३ जानेवारी २०२१ रोजी कॅम्प चौक येथे दंड झाला. कार मालकास मोबाइलवर ई-चालान झाल्याचा एसएमएस आला. त्याने लगेच सदर पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा आरोपीला सहजपणे शोधता आले असते; परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी