शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

माल वाहतूक बंद : नागपुरात  किराणा दुकानात आवश्यक वस्तूंचा साठा संपण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:37 IST

पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे.

ठळक मुद्देहोलसेलमधून साखर, खाद्यतेल, आटा यांची आवक घटली

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पूर्वी राज्य शासन आणि नंतर केंद्र शासनाच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर किराणा दुकांनामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साखर, खाद्यतेल, धान्य, कणीक, आटा, मैदा या वस्तूंना जास्त मागणी असल्याने बहुतांश किराणा दुकानातील साठा संपण्याची भीती आहे. माल वाहतूक बंद असल्याने जिल्हा वा राज्याबाहेरून तसेच होलसेल मार्केटमधून या वस्तूंची आवक बंद असल्याने पुढे या वस्तूंची विक्री करणे शक्य होणार नाही. याकरिता शासनाने मदत करून आवश्यक वस्तूंची माल वाहतूक खुली करण्याची मागणी किराणा दुकानदारांनी केली आहे.नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, लॉकडाऊन आणि कलम १४४ चे पालन करीत नागपुरातील सर्वच किराणा दुकानदारांनी वाजवी किमतीत जीवनाश्यक वस्तूंची विक्री केली आणि साठा असेपर्यंत करणार आहेत. बैठकांमध्ये जिल्हाधिकारी किराणा दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. साठा असेपर्यंत वस्तूंची विक्री करूच, अन्यथा दुकाने बंद करावी लागतील. लोकांकडून अनावश्यक मागणी वाढली आहे. अनेकांनी दोन-दोन महिन्याच्या किराणा मालाची खरेदी केली आहे. त्यामुळे गरजूंना विक्रीसाठी साठा कमी पडत आहेत. देशात जीवनावश्यक वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, पण बहुतांश ठिकाणी माल वाहतूक थांबल्याने किरकोळ किराणा दुकानात वस्तू पोहोचत नाहीत. याकरिता शासनाने असोसिएशनला मदत करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.असोसिएशनचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, किराणा दुकानांमध्ये सर्व वस्तूंचा साठा उपलब्ध करून देण्याचे व्यापाऱ्यांचे प्रयत्न आहेत. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडू देणार नाही, याची हमी दुकानदार देत आहेत. होलसेलमधून माल मागविण्यात येत आहे. पण त्यांच्याकडे उपलब्ध असलेला माल आम्हाला पाठवत आहेत. माल वाहतूक बंद असल्याने वस्तू शहरात आलेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची माल वाहतूक सुरू ठेवावी.इतवारी तेल असोसिएशनचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर म्हणाले, गुजरात आणि अन्य राज्यांतून शेंगदाणा आणि सोयाबीन कच्च्या तेलाची आवक बंद असल्याने खाद्यतेलाचा पॅकिंग कारखाना बंद केला आहे. आमचे स्वाद ब्रॅण्ड तेल साठा असेपर्यंत विकले. पण आता पॅकिंग बंद असल्याने तेलाची विक्री शक्य नाही. शासनाने पासेसची व्यवस्था करून आवश्यक माल वाहतूक खुली करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीत केली आहे. याकरिता जिल्हाधिकारीही सकारात्मक आहेत. कच्चा माल पोहोचल्यास पॅकिंग करून खाद्यतेल बाजारात उपलब्ध करून देऊ. कमतरता भासू देणार नाही.गिन्नी अ‍ॅग्रोचे संचालक गोविंद मंत्री म्हणाले, कणीक, आटा, मैदा गिन्नी ब्रॅण्ड नावाखाली बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहे. कुठलीही कमतरता पडू देणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. युनिटमध्ये अर्धेच कर्मचारी असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे गहू ओला झाला आहे. त्यामुळे खरेदी थांबली आहे. पण उपलब्ध कच्च्या मालापासून फिनिश माल तयार करण्यात येत आहे. लोकांची मागणी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर