शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तिबेटची गरज

By admin | Updated: July 7, 2015 02:42 IST

चीनचे विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता भारताच्या सुरक्षेसाठी तिबेट हा स्वतंत्र देश असणे गरजेचे आहे,...

समता सैनिक दल : विमलसूर्य चिमणकर यांचे प्रतिपादन नागपूर : चीनचे विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता भारताच्या सुरक्षेसाठी तिबेट हा स्वतंत्र देश असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर यांनी केले. दलाई लामा यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त हिंदी मोरभवन येथे समता सैनिक दलातर्फे तिबेटच्या मुक्ती आंदोलनावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तुनवार, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे व्यासपीठावर होते. अ‍ॅड. चिमणकर म्हणाले, तिबेट हे एक प्राचीन बौद्ध राष्ट्र आहे. आज ते चीनच्या ताब्यात आहे. त्याच्या स्वातंत्र्यासाठी दलाई लामा यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. आजही हा संघर्ष सुरू आहे. भारत हा नेहमीच तिबेटच्या बाजूने राहिला आहे. परंतु सध्या केंद्र सरकारचे धोरण मात्र कमालीचे दुटप्पीचे असल्याचे दिसून येत आहे. तिबेटची सुरक्षा ही भारतासाठी किती आवश्यक आहे, हे एकूणच भौगोलिक परिस्थितीवरून दिसून येते. अशा वेळी भारताने तिबेटचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. इतकेच नव्हे तर ज्या चीनने भारताला नेहमी धोका दिला आहे. देशावर आक्रमण केले. असे असतांनाही चीनसोबत संबंध वाढविण्यावर भर दिला जात आहे. हे एकूणच चुकीचे आहे. प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनीसुद्धा भारताच्या विदेश धोरणावर प्रहार केला. भारताची विदेश नीती ही अतिशय कमकुवत आहे. तिबेटच्या मुद्यावर भारत लाचारीने वागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक बोंदाडे यांनी तिबेटमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर प्रकाश टाकला. भारताने आपल्या सुरक्षेसाठी तिबेटला मदत करणे गरजेचे आहेच. परंतु जगानेसुद्धा मानवतावादी दृष्टिकोनातून तिबेटला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपुत्त यांनी संचालन केले. विदर्भ संघटक राहुल वासनिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)