नागपुरातील उंटखान्यात चारचाकी वाहने जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:17+5:302021-01-04T04:07:17+5:30

नागपूर : उंटखाना परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेल्या पाच ते सहा चारचाकी वाहने जाळली. शनिवारी मध्यरात्री २ ...

Four-wheelers set on fire at a camel shed in Nagpur | नागपुरातील उंटखान्यात चारचाकी वाहने जाळली

नागपुरातील उंटखान्यात चारचाकी वाहने जाळली

नागपूर : उंटखाना परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेल्या पाच ते सहा चारचाकी वाहने जाळली. शनिवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

उंटखाना येथील दहीपुरा ले-आऊट येथे घराबाहेर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांना काही समाजकंटकांनी आग लावली. १० ते १२ गाड्या परिसरात पार्क होत्या. यात तीन कार पूर्णपणे जळाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. वाहनाला आग लागल्याचे लक्षात आल्यावर परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही कारचे नुकसान होण्यापासून टळले. काही कार वाचविण्यात यश आल्याने माोठा अनर्थही टळला. अशा घटनेत कारमधील पेट्रोल टँकचा स्फोट होण्याचा धोका असतो. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो टळला. याप्रकरणी इमामवाडा पोलीस चौकशी करीत आहेत. नजीकच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: Four-wheelers set on fire at a camel shed in Nagpur