शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये कथ्थक व लावणीला विदेशी तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:24 IST

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा अंतिम दिवस देशी नृत्यावर थिरकणाऱ्या  विदेशी ललनांनी गाजविला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या दोघींच्या सादरीकरणाने दर्शकही मंत्रमुग्ध झाले.

ठळक मुद्देरशियन लीनाच्या अदांनी दर्शक घायाळ : स्पॅनिश नीराचा शास्त्रीय अंदाज

आॅनलाईन लोकमतनागपूर : एकीकडे स्पेनच्या नीरा सॉरेसने कथ्थकवर असा काही शास्त्रीय अंदाज पेश केला की दर्शकही मोहित झाले. दुसरीकडे रशियाच्या लीना ऊर्फ आया खासनाच्या मराठी लावणीवरील अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले. ‘मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...’ म्हणत लीनाने स्टेजवर अशी काही जादू केली की येथे उपस्थित प्रत्येकाला तोंडात बोट घालायला भाग पाडले.नीरा सॉरेस तशी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस, डान्सर आणि कोरिओग्राफरही आहे. विशेष म्हणजे तिने बनारसमधून कथ्थकचे शास्त्रीय प्रशिक्षणही घेतले आहे. विदेशी असूनही शास्त्रीय नृत्यात नीराने मिळविलेले कौशल्य तिच्या सादरीकरणातून स्पष्ट दिसत होते. तिची प्रत्येक मुव्हमेंट प्रेक्षकांना संमोहित करणारी होती. भारतीय परंपरेप्रमाणे ‘गाईये गणपती जगवंदना...’ या वंदनगीताने तिने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यानंतरच्या प्रत्येक गीतावर तिची अदाकारी डोळ्यात भरणारी होती. या शास्त्रीय नृत्यात डोळ्यांचे हावभाव आणि अदाकारी महत्त्वाची असते. नीरा या सादरीकरणात कुठेही कमी नव्हती. तिच्या प्रत्येक स्टेप्सवर दर्शकांकडून टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता. काही हिंदी चित्रपट गीतांवरही तिने शास्त्रीय अंदाजात डान्स सादर केला आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांकडून ‘वन्स मोअर...’चा प्रतिसाद तिला मिळाला. सादरीकरण संपूनही परत सादरीकरणासाठी तिला आवाहन केले गेले आणि तिनेही दर्शकांना नाराज केले नाही.दुसरीकडे फूड स्टॉलजवळच्या स्टेजवर बार्सिलोना(रशिया)च्या लीनाने आग लावली. ‘ती आली, ती नाचली आणि तिने जिंकले’ असाच काही हा परफॉर्मन्स होता. वर्णाने गोरीपान ही पोरगी मराठमोळ्या नऊवारीत ‘अप्सरा’सारखीच स्टेजवर अवतरली. लाल साडीमध्ये सजलेले तिचे ते विदेशी रूप डोळ्यात भरणारे आणि डान्सच्या अदा तर दर्शकांना ‘वाहवा...’ करायला लावणाऱ्या . ‘वाजले की बारा...’ या लोकप्रिय लावणीवर तिचे सादरीकरण तेवढेच कौशल्यपूर्ण होते. लावणीच्या तिच्या अदा पाहून उपस्थित प्रेक्षक भान हरपून तिच्या तालावर थिरकत होते. लावणी संपताच दर्शक एका स्वरात ‘वन्स मोअर...’ असे ओरडले. ती थांबली नाही. मात्र एका नव्या लावणीवर तिने दर्शकांचे अभिवादन स्वीकारले.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरdanceनृत्य