शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे वृद्ध उडाला आकाशात..!

By admin | Updated: May 10, 2014 23:46 IST

वादळात घरे, झाडे जमीनदोस्त होणे, घरावरील टीना, कवेलू, अन्य वस्तू उडून जाणे आदी घटना आपण नेहमीच बघतो.

 चंद्रपूर जिल्ह्यातील घटना : खाली पडून गंभीर जखमी

वरोरा : वादळात घरे, झाडे जमीनदोस्त होणे, घरावरील टीना, कवेलू, अन्य वस्तू उडून जाणे आदी घटना आपण नेहमीच बघतो. मात्र एखादी व्यक्ती वादळामुळे चक्क आकाशात उडाली असे दृश्य केवळ चित्रपटातच बघायला मिळते. परंतु प्रत्यक्षात हे दृश्य अनुभवले वरोरा तालुक्यातील बोरगाव वासियांनी. तालुक्यातील बोरगाव (शि) पांढरतळा, लोणार आदी गावांमध्ये ८ मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास अचानक वादळ आले. यावेळी अनेक शेतकरी आपल्या शेतात काम करीत होते. अनेकांच्या घरावरील छत, घरातील सामानदेखील दोन ते तीन किमी अंतरापर्यंत उडून गेले. विद्युत खांब पडले. झाडे उमळून पडली. घरांना तडे गेले. पाऊस आल्याने घरातील धान्यही ओले झाले. त्यामुळे सर्वच संकटग्रस्त आपल्या वस्तू शोधण्यात व्यस्त होते. याच वादळात बोरगाव (शि) येथील श्रावण सखाराम नन्नावरे आपली गाईगुरे बांधण्यासाठी घराबाहेर पडले. गाईगुरांना बांधून बांधून घराकडे परत येत असताना ते वादळात सापडले. वादळाने त्यांना अक्षरश: जमिनीवरुन उचलून घेतले. काही वेळ ते आकाशात राहिले आणि वादळाचा वेग कमी होताच जमिनीवर कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कंबरेला दुखापत झाल्याने वरोरा येथील खासगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहेत. वीज पडून जखमी व मृत पावलेल्यांना तसेच वादळ, अकाली पाऊस गारपिटीने नुकसान झाल्यास शासन तातडीने मदत देते. वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या या जखमीस देखील मदतीची अपेक्षा आहे. कारण तळहातावर पोट घेऊन जगणार्‍या श्रावण नन्नावरे यांना उपचाराचा खर्च झेपावणारा नाही. वादळ, अकाली पाऊस, गारपीट ही नैसर्गिक आपत्ती मानली जाते. त्यातील आपदग्रस्तांना मदत दिली जाते. त्यामुळे वादळात सापडून जखमी झालेल्या नन्नावरे यांना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य नितीन मत्ते यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)