हिंगण्यात हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 14:26 IST2023-06-28T14:25:31+5:302023-06-28T14:26:22+5:30

पीडितेची सुटका

Flesh trade den in Hingane hotel, two arrested | हिंगण्यात हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा, दोघांना अटक

हिंगण्यात हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा, दोघांना अटक

नागपूर : अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करून घेणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाने गजाआड करून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

अमोल मनोहर ढेरे (वय ३०, रा. वॉर्ड नं. २, गोंडखेरी, कळमेश्वर) आणि शिवा सुरेश लोदिया (वय १९, रा. आदिवासी प्रकाशनगर, कळमना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी दुपारी १:५५ वाजता एका स्वयंसेवी संस्थेकडून हिंगणा येथील संगम रोडवरील मा अन्नपूर्णा हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करवून घेण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा शाखेला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा शाखेच्या निरीक्षक शुभांगी देशमुख, हिंगणाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे, पोलिस निरीक्षक गोकुल महाजन, कॉन्स्टेबल संतोष येलुरे यांच्या पथकाने संबंधित हॉटेलमध्ये दोन बनावट ग्राहक पाठविले. तेथे त्यांनी आरोपींसोबत अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध करण्याबाबत बोलणी केली. बनावट ग्राहकांनी इशारा करताच पोलिसांच्या पथकाने तेथे धाड टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका करून पीडित मुलीला पाटनकर चौकातील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तपास हिंगणाचे पोलिस निरीक्षक गोकुल महाजन करीत आहेत.

Web Title: Flesh trade den in Hingane hotel, two arrested