शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह पाच आरोपी अटकेत

By admin | Updated: January 22, 2015 02:52 IST

निवृत्तीनंतर पतीने दमडीही न देण्याचे सांगितल्यामुळे पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

नागपूर : निवृत्तीनंतर पतीने दमडीही न देण्याचे सांगितल्यामुळे पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान जरीपटका पोलिसांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत कार्यरत रमेश रावजी देशभ्रतार यांच्या खुन प्रकरणी त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना अटक केली आहे.
वंदना देशभ्रतार, तिचा प्रियकर संदीप ऊर्फ अप्पू प्रकाश झोडापे, संदीपचे साथीदार मयूर सुर्यकांत बॅनर्जी, मनीष मेश्राम, सुरज मेश्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाचही आरोपींना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. वंदना आणि संदीप उर्फ अप्पू झोडापेचे मागील चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधाची माहिती रमेशला मिळाल्यामुळे वंदना आणि रमेशमध्ये वाद सुरू झाला. तेंव्हापासून ते बाबादीपसिंहनगर येथील घरी राहायला आले. तेथे ते दरबारही भरवायचे. याच दरम्यान मानेवाड्यातील एक महिला दरबारात येत होती. त्या महिलेसोबत रमेशचे अनैतिक संबंध असल्याची शंका वंदनाला आली. यावरून तिने रमेश सोबत वाद घातला. त्यांचा वाद विकोपाला गेला. फेब्रवारी महिन्यात रमेश सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या रकमेतून एक दमडीही देणार नसल्याची बतावणी वंदनासमोर केली. पतीच्या रकमेतून काहीच मिळणार नसल्याची बाब वंदनाने तिचा प्रियकर संदीपला सांगितली. त्यामुळे १ लाख रुपये देते, तूच माझ्या पतीचा काटा काढ, असे वंदनाने संदीपला सांगितले. तिने संदीपला एक लाख रुपये दिले. संदीपने इतर तीन साथीदारांच्या मदतीने रमेशच्या खुनाचा कट रचला. १६ जानेवारीला ते बाबादीपसिंहनगरात आले. त्यांनी रमेशला मारहाण करून दुपट्ट्याने त्यांचा गळा आवळून खुन केला. चोरीच्या उद्देशातून खूून करण्यात आल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी आरोपींनी रमेशच्या घरातील साहित्य व सोन्याची अंगठी चोरून नेली.
१७ जानेवारीला ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान जरीपटका पोलिसांनी संशयावरून रमेशची पत्नी वंदनाला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने आपणच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचे कबूूल केले. (प्रतिनिधी)