शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दवर मत्स्य माफियांचे जाळे

By admin | Updated: April 25, 2016 02:35 IST

१६ हजार हेक्टरवर पसरलेल्या गोसेखुर्द जलाशयात मासेमारीला बंदी आहे. परंतु जलाशयातून मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारी जोरात सुरू आहे.

नागपूर : १६ हजार हेक्टरवर पसरलेल्या गोसेखुर्द जलाशयात मासेमारीला बंदी आहे. परंतु जलाशयातून मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारी जोरात सुरू आहे. मत्स्य माफियांनी आंध्र प्रदेशातून मासेमाऱ्यांना आणून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी करून घेतली जात आहे. स्थानिक लोकांना मात्र विरोध करण्यात येत आहे. अवैध मासेमारीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून, यावर कुणाचाही अंकुश नाही. गोसेखुर्द प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गावे गेली आहेत. काही गावांचे पुनर्वसन झाले असून, काही गावकऱ्यांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मोबदला न मिळाल्याने गावकरी गावातच थांबले आहेत. १६,३०१ हेक्टरवर पसरलेले जलाशय मत्स व्यवसायाला अनुकुलता आहे. परंतु जलाशयात मासेमारीला बंदी आहे. जलाशयातील मास्यांची उपलब्धता लक्षात घेता, काही मत्स माफियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारी होत आहे. जलाशयाला लागून असलेल्या सालेसरी, सालेभट्टी, पात्री, टेकेपार, मरुपार, गोठणगाव या भागात मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारी सुरू आहे. मत्स माफियांकडून या भागात आंध्रप्रदेशातून पट्टीच्या मासेमारांना येथे आणले आहे. या मासेमाऱ्यांचे कुटुंब येथे पिंजरा टाकून मासेमारी करीत आहे. माफियाकडून मासेमारांना थोडेथोडके पैसे देऊन लाखो रुपयांचा माल येथून उचलत आहेत. उमरेडच्या जंगलातून हा अवैध प्रकार सुरू आहे. परिसरातील स्थानिक मासेमारांना मात्र, जलाशयात मासेमारी करण्याला विरोध करण्यात येतो. येथील मासेमाऱ्यांच्या बोटी पळविण्यात येत आहेत. त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही. या सर्व प्रकारावर कुणाचाही अंकुश नाही. हा तलाव प्रकल्पग्रस्तांना मासेमारीसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक मासेमाऱ्यांकडून होत आहे. मोठ्या नेत्यांचा पाठिंबागोसेखुर्द जलाशयात फोफावलेल्या अवैध मासेमारीला मोठ्या नेत्यांकडून पाठींबा मिळत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. जंगलामधून हा प्रकार सुरू असतानाही, कुठेही त्यांची अडवणूक होत नाही. तक्रार करायला गेल्यास कोणी तक्रारीची दखल घेत नाही. स्थानिक प्रशासनसुद्धा याकडे डोळेझाक करीत आहे. आंध्रचे मासेमार आणून आमच्या पोटावर घाला घातला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.