अगोदर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी

By योगेश पांडे | Updated: April 1, 2024 17:42 IST2024-04-01T17:41:56+5:302024-04-01T17:42:42+5:30

२०२१ साली व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला व तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने तिच्यावर अत्याचार केले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करायचा.

First the physical abuse, then the threat of making the photo viral | अगोदर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी

अगोदर अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी

नागपूर : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले व त्यानंतर आरोपीने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रशिक अविनाश झोडापे (२४, अंबाझरी टेकडी) असे आरोपीचे नाव आहे. २०२१ साली त्याची एका २० वर्षीय मुलीशी ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली व त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०२१ साली व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला व तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने तिच्यावर अत्याचार केले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करायचा.

२१ मार्च रोजी तिने परत त्याला विचारणा केली असता त्याने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्नास नकार दिला. अखेर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाणे गाठले व प्रशिकविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
 

Web Title: First the physical abuse, then the threat of making the photo viral