शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर तूर्तास आॅनलाईन मिळणार नाही

By admin | Updated: June 30, 2015 03:21 IST

राज्यामध्ये एफआयआरची प्रत आॅनलाईन उपलब्ध होण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ओडीशा

प्रतीक्षा : सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबितनागपूर : राज्यामध्ये एफआयआरची प्रत आॅनलाईन उपलब्ध होण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ओडीशा उच्च न्यायालयाच्या यासंदर्भातील निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. हे प्रकरण अद्याप प्रलंबित असल्यामुळे राज्य शासन तूर्तास याविषयी अंतिम निर्णय घेणार नाही अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयात ‘एफआयआर’ची प्रत आॅनलाईन उपलब्ध करून देता येऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, संवेदनशील प्रकरणांतील ‘एफआयआर’ सार्वजनिक होऊ नये यासाठी प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन करणे आवश्यक असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाच्या आधारे ओडीशा उच्च न्यायालयाने ‘अरुण बुधिया’ प्रकरणात ‘एफआयआर’ची प्रत आॅनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन ओडीशा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.(प्रतिनिधी)नागपूर हायकोर्टात याचिका‘एफआयआर’ची प्रत आॅनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. जयकुमार दीक्षित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला यासंदर्भात १० आठवड्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर पुन्हा चार आठवड्यांचा वेळ वाढवून दिला होता. परंतु, शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचा मुद्दा पुढे आल्यामुळे ‘एफआयआर’ची प्रत आॅनलाईन मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जवळपास सर्वच व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. एका क्लीकवर हवे ते उपलब्ध होते. मात्र, ‘एफआयआर’सारखा महत्त्वाचा दस्तऐवज आजही ‘आॅनलाईन’ मिळत नाही. ‘एफआयआर’ची प्रत मिळविण्यासाठी पोलीस ठाण्याच्या खेटा खाव्या लागतात किंवा पोलिसांचे हात ओले करावे लागतात.