Fire at Well Treat Hospital in Nagpur, several patients injured | Well Treat Multispeciality Hospital Fire : नागपूरमधील वेल ट्रीट हॉस्पिटलला आग, तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Well Treat Multispeciality Hospital Fire : नागपूरमधील वेल ट्रीट हॉस्पिटलला आग, तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

ठळक मुद्देया हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना तातडीने दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले.

नागपूर - अमरावती मार्गावरील वाडी नजीकच्या वेल ट्रीट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Well Treat Multispeciality Hospital, Wadi )शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आग लागली. हॉस्पिटलमधील एससीमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे ही आग लागली आणि एकच खळबळ उडाली.  (Fire at Well Treat Multispeciality Hospital, Wadi in Nagpur, several patients injured)

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. तसेच, या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना तातडीने दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. तर या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

याचबरोबर, हॉस्पिटमध्ये उपचार घेणाऱ्या ३ ते ४  रुग्णांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सर्व रुग्ण सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: Fire at Well Treat Hospital in Nagpur, several patients injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.