शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएलच्या ‘फिडर’ ला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 03:05 IST

काटोल मार्गावरील वीरचक्र कॉलनी येथील स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) फिडर पिलरमध्ये शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती.

वीरचक्र कॉलनी अंधारात : अनेकांचे कूलर बंद पडले नागपूर : काटोल मार्गावरील वीरचक्र कॉलनी येथील स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) फिडर पिलरमध्ये शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. यामुळे हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. स्थानिक लोकांनी लगेच घटनेची एसएनडीएलला माहिती दिली. त्यावर एसएनडीएलच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून फिडर पिलरला लागलेली आग विझविली; शिवाय पथकाने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु रात्री १ वाजतापर्यंत त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. शेवटी एसएनडीएलने रात्री २ वाजताच्या सुमारास दुसऱ्या फिडरवरून या परिसरात वीजपुरवठा सुरू केला. मात्र एकाच फिडरवर अधिक भार वाढल्याने रात्रभर विजेचा लपंडाव चालला. विशेष म्हणजे, सध्या नागपुरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशास्थितीत मागील तीन दिवसांपासून येथे सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय विजेचा पॉवर कमी-जास्त होत असल्याने अनेकांचे कूलर बंद पडले असून, काहींच्या कूलरच्या मोटरसुद्धा जळाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. माहिती सूत्रानुसार, एसएनडीएलने शनिवारी दिवसभर येथील फिडर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले आहेत. त्यामुळे रविवारीसुद्धा या परिसरातील नागरिकांना विजेच्या समस्येचा सामना करावा लागला. (प्रतिनिधी)