नागपूरजवळील निमजी गावात रिलायन्स रिटेल गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:18 IST2021-12-23T10:59:43+5:302021-12-23T12:18:06+5:30

निमजी गावातील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

Fire at Reliance Retail Warehouse near nagpur | नागपूरजवळील निमजी गावात रिलायन्स रिटेल गोदामाला भीषण आग

नागपूरजवळील निमजी गावात रिलायन्स रिटेल गोदामाला भीषण आग

नागपूर : नागपूरजवळील निमजी गावात रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत मोठं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास निमजी गावातील रिलायन्स रिटेलच्या गोदामाला आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. आग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु, आगीत गोदामातील धान्य आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळती आहे. 

Web Title: Fire at Reliance Retail Warehouse near nagpur