आगीचा भडका, टायर रिमोल्डिंग कंपनी पेटली; भंडारबोडीत शॉर्टसर्किट, जिनिंगचा कापूस जळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:27 IST2026-03-17T16:25:17+5:302026-03-17T16:27:18+5:30

Nagpur : नागपूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी चार ठिकाणी आगी लागून मोठे नुकसान झाले. दिघोरी रिंग रोडलगत जबलपूर रोडवरील एका टायर रिमोल्डिंग कंपनीत भीषण आग लागली.

Fire breaks out, tire remolding company catches fire; short circuit in warehouse, ginning cotton burns | आगीचा भडका, टायर रिमोल्डिंग कंपनी पेटली; भंडारबोडीत शॉर्टसर्किट, जिनिंगचा कापूस जळाला

Fire breaks out, tire remolding company catches fire; short circuit in warehouse, ginning cotton burns

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी चार ठिकाणी आगी लागून मोठे नुकसान झाले. दिघोरी रिंग रोडलगत जबलपूर रोडवरील एका टायर रिमोल्डिंग कंपनीत भीषण आग लागली. कंपनीतील टायर व रबर साहित्य जळाल्याने आकाशात धुराचे लोळ पसरले. यशवंत स्टेडियमजवळील आश्रमालगतच्या उदासी झोपडपट्टीमध्ये सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. इकडे कुही तालुक्यातील भंडारबोडी येथील कल्पना जिनिंग प्रेसिंगच्या आवारात शॉर्टसर्किटमुळे कापूस जळाला. कळमेश्वर तालुक्यातील झुनकी येथेही तीन झोपड्या जळाल्या.

यशवंत स्टेडियमजवळील उदासी आश्रमाला लागून असलेल्या झोपडपट्टीमध्ये सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या, तर दोन झोपड्यांचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या कॉटनमार्केट, गंजीपेठ व सिव्हिल लाइन्स येथील तीन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. योगेश ठाकूर, सुरेश ठाकूर, बसमती ठाकूर व राजेंद्र संडुक या चार जणांच्या झोपड्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्या, तर कांचन पटेल व मनोज यादव यांच्या झोपड्यांचेही मोठे नुकसान झाले. आगीमध्ये घरातील टीव्ही, पंखे, कपाट, मोबाइल, कपडे व भांडी जळाल्याने सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. 

ट्रॅक्टरच्या इंजिनमधील ठिणगीमुळे कापसाने घेतला पेट

कुही तालुक्यातील चिपडीनजीकच्या भंडारबोडी येथील कल्पना जिनिंग प्रेसिंगच्या आवारात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. कापूस हाताळत असताना कॉटन लिफ्टर जोडलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडली आणि जमिनीवर पडलेल्या कापसाने पेट घेतला. ही आग पसरत गेल्याने जिनिंगच्या आवारात ठेवलेत्या ढिगातील शेकडो क्विंटल कापूस जळून खराब झाला. यासोबतच कळमेश्वर तालुक्यातील झुनकी येथे एकापाठोपाठ एक अशा एकूण तीन झोपड्यांना आग लागली. या आगीत तिन्ही घरांमधील जीवनावश्यक साहित्य, कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचर जळून राख झाल्याने किमान १ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title : नागपुर में आग का कहर: टायर फैक्ट्री, कपास मिल, और झुग्गियाँ जलीं।

Web Summary : नागपुर में कई जगहों पर आग लगने से भारी नुकसान हुआ। एक टायर रीमोल्डिंग कंपनी, एक कपास मिल और कई झुग्गियाँ जलकर खाक हो गईं। शॉर्ट सर्किट और चिंगारियों से आग लगी, जिसके परिणामस्वरूप भारी वित्तीय नुकसान हुआ और निवासी विस्थापित हो गए।

Web Title : Fires Engulf Nagpur: Tire Factory, Cotton Gin, and Shanties Burn.

Web Summary : Multiple fires struck Nagpur, causing significant damage. A tire remolding company, a cotton gin, and several shanties were destroyed. Short circuits and sparks ignited the blazes, resulting in substantial financial losses and displacement for residents.