वेकोली प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढा

By योगेश पांडे | Updated: March 31, 2026 20:34 IST2026-03-31T20:33:07+5:302026-03-31T20:34:03+5:30

महसूलमंत्री बावनकुळे यांची केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे मागणी : दिल्लीत घेतली भेट

Find a solution to the problems of farmers and citizens affected by the Vekoli project. | वेकोली प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढा

Find a solution to the problems of farmers and citizens affected by the Vekoli project.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वेकोली प्रकल्पामुळे प्रभावित नागरिकांच्या प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. वेकोलीच्या प्रकल्पांमुळे बाधित शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी यावेळी बावनकुळे यांनी केली.

७ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत वेकोलि संचालक मंडळासोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती. मात्र, संचालक मंडळाने कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर पावले उचललेली नाही. त्यामुळे प्रभावित नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे बावनकुळे यांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांना सांगितले.

यावेळी आदासा ओसी फेज-२ व सिंगोली फेज-२ येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुद्दा मांडण्यात आला. तसेच बिना-भानेगाव येथील नागरिकांचे योग्य पुनर्वसन, जमीन अधिग्रहणासाठी न्याय्य व वाढीव मोबदला, अन्यायकारक एसओपी रद्द करणे आणि सावनेर शहरातील आरक्षण हटविणे यांसारखे महत्त्वाचे मुद्देदेखील बावनकुळे यांनी मांडले. कोल इंडिया आरआर पॉलिसी २०१२ तसेच आरएफसीटीएलएआरआर ॲक्टअंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी

Web Title : वेकोली परियोजना प्रभावित किसानों, नागरिकों के मुद्दे हल करें: बावनकुले

Web Summary : चंद्रशेखर बावनकुले ने केंद्रीय कोयला मंत्री जी. किशन रेड्डी से वेकोली परियोजना प्रभावित किसानों और नागरिकों के मुद्दों को हल करने का आग्रह किया। उन्होंने रोजगार, पुनर्वास, उचित मुआवजे और नीति सुधार जैसे लंबित मुद्दों पर प्रकाश डाला, और बढ़ती असंतोष को दूर करने के लिए तत्काल प्रशासनिक कार्रवाई की आवश्यकता पर जोर दिया।

Web Title : Solve pending issues of WCL project-affected farmers, citizens: Bawankule

Web Summary : Chandrashekhar Bawankule urged Union Coal Minister G. Kishan Reddy to resolve issues concerning WCL project-affected farmers and citizens. He highlighted pending issues like employment, resettlement, fair compensation, and policy reforms, emphasizing the need for immediate administrative action to address growing discontent.