शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर क्षयरोगाचा वॉर्ड सुरू

By admin | Updated: March 16, 2015 02:26 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) काही अंतरावर असलेल्या छाती व क्षयरोग विभागाची स्थिती वाळीत टाकल्याप्रमाणेच होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) काही अंतरावर असलेल्या छाती व क्षयरोग विभागाची स्थिती वाळीत टाकल्याप्रमाणेच होती. या विभागाला ४२ व ४३ असे दोन वॉर्ड होते. ४२ क्रमांकाचा वॉर्ड महिलांसाठी तर ४३ क्रमांकाचा वॉर्ड पुरुषांसाठी होता. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे छाती रोगाच्या रुग्णाला याचा धोका होण्याची शक्यता अधिक असायची. विभागप्रमुख डॉ. घोरपडे यांनी छाती रोगाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात या रुग्णासाठी वॉर्ड मिळाला. जुन्या वॉर्डातील मुनष्यबळ या नव्या वॉर्डात गेले. यामुळे क्षयरोगाचे दोन वॉर्ड सांभाळण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडले. परिणामी, महिला आणि पुरुषांना एकाच वॉर्ड क्र. ४३ मध्ये ठेवण्यात येऊ लागले. एकच प्रसाधनगृह असल्याने पुरुष आणि महिला रुग्णांना याचा वापर करताना अडचणीचे जात होते. जागोजागी टाईल्सही उखडल्या होत्या. रुग्णांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वर्षभरापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली हा वॉर्ड बंद करण्यात आला. बांधकाम विभागाने काम पूर्ण करायला बराच वेळ घेतला. यातच निधीअभावी गेल्या चार महिन्यांपासून कामही बंद होते. विभागाचे डॉक्टर मेयो रुग्णालयात रुग्णांना रेफर करीत होते. परंतु तेथीलही वॉर्डही फुल्ल राहत असल्याने भरती कुठे करावे, हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आरोग्य विभागाच्या वॉर्डात रुग्ण ठेवण्यात येऊ लागले होते. परंतु हा वॉर्ड ‘एमडीआर’ रुग्णांसाठी राखीव असल्याने फारच गंभीर रुग्ण ठेवण्यात येत होते. याविषयी ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेतली. पदावर रुजू होताच त्यांनी बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून देत ‘वॉर्ड ४३’चे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवार १६ मार्चपासून हा वॉर्ड सुरू होत आहे. (प्रतिनिधी)