शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
5
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
6
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
7
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
8
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
9
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
10
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
11
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
12
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
13
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
14
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
15
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
16
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
17
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
18
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
19
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
20
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
Daily Top 2Weekly Top 5

५0 हजार भरा, एफआयआर रद्द करा

By admin | Updated: May 28, 2014 01:00 IST

नागपुरातील दोन नोकरदार महिलांच्या वादाचा प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) रद्द करण्यासाठी पोलीस कल्याण निधीमध्ये ५0 हजार रुपये जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च

हायकोर्टाचे निर्देश : नागपुरातील दोन महिलांचा वाद

नागपूर : नागपुरातील दोन नोकरदार महिलांच्या वादाचा प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) रद्द करण्यासाठी पोलीस कल्याण निधीमध्ये ५0 हजार रुपये जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

शबाना (४१) व करिना (२८) अशी महिलांची नावे आहेत (नावे काल्पनिक). १४ फेब्रुवारी २0१४ रोजी करिनाने शबानाविरुद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. दोघींचाही एकमेकींशी चांगला परिचय असून त्या वेगवेगळ्या बँकेत नोकरीवर आहेत. शबानाचे लग्न झाले असून तिला १ मुलगी आहे. करिना अविवाहित आहे. पोलीस तक्रारीनुसार शबानाने आधी करिनाला फोन केला. यानंतर ती करिनाच्या घरी येऊन धडकली. दरम्यान, त्यांच्यात जोरदार भांडण झाले. शबानाने करिनाला शिविगाळ केली. हा सर्व प्रकार करिनाच्या घरात घडला होता. पोलीस तक्रारीनंतर दोघींनीही आपसी सामंजस्याने वाद मिटवून संबंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने ‘मदन मोहन अँब्बोट ’ व ‘गियान सिंग’ या प्रकरणांमध्ये वाद खासगी स्वरूपाचा असेल व त्यात सार्वजनिक कायद्याचा समावेश नसेल तर उच्च न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ मधील अधिकारांचा उपयोग करून एफआयआर व फौजदारी खटला रद्द करू शकते, असा खुलासा केला आहे. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने कलम ४८२ मधील अधिकारांचा उपयोग करण्याचा निर्णय घेऊन शबानाला नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस कल्याण निधीमध्ये ५0 हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, निर्धारित कालावधीत रक्कम जमा केली नाही तर एफआयआर रद्द करण्याचा आदेश आपोआप परत होईल व संबंधित अर्ज खारीज समजण्यात येईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)