शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके; शेजारणीने काढला वादाचा वचपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:35 IST

किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षक महिलेवर शेजारच्या महिलेने कुत्रे सोडले.

नागपूर : किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षक महिलेवर शेजारच्या महिलेने कुत्रे सोडले. या कुत्र्यांनी लचके तोडल्याने डिम्पल ऊर्फ शुभांगी राजेंद्र नायडू-पवार या जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या दाम्पत्याने आपल्या पाळीव कुत्र्यांकडून हा हल्ला करवून घेतला ते दाम्पत्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे. त्याचमुळे की काय, महिला पोलिसाची तक्रार नोंदवून घेताना पोलिसांनी कचखाऊ धोरण अवलंबल्याचा आरोप पवार कुटुंबियांकडून होत आहे.पोलीस दलच नव्हे तर उपराजधानीत चर्चेचे मोहोळ उडविणारे हे प्रकरण बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. न्यू मनीषनगरात नवनाथ सोसायटी असून, येथील तीर्थ पॅलेस अपार्टमेंटमध्ये एएसआय डिम्पल नायडू राहतात. त्या शहर पोलीस दलात, बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्या-ज्या इमारतीत त्या राहतात तेथेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी रजत देशमुखही राहतात. त्यांनी व अन्य एकाने या इमारतीत मोबाइल टॉवर लावण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सहापैकी डिम्पलसह चार रहिवाशांनी त्याला विरोध केला. या पार्श्वभूमीवर, रविवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास डिम्पल कार्यालयातून घरी परतल्या. नंतर एक वर्षीय बाळाला घेतले आणि त्याला फिरविण्याच्या उद्देशाने खाली आल्या. यावेळी खाली संजना देशमुख त्यांची तीन पाळीव कुत्री घेऊन होत्या.काय झाले कळायला मार्ग नाही, त्यांनी शूट गो ... म्हटले आणि तीनही कुत्री डिम्पल यांच्यावर धावली. छोट्या बाळाला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डिम्पल यांना कुत्र्यांनी अक्षरश: लोळविलेच. पती राजेंद्र पवार यांनी डिम्पल यांच्या हातून बाळ घेतले. तोवर कुत्र्यांनी डिम्पल यांच्या हात, पाय, पोटरी, मांडी, कंबरेवर जागोजागी चावे घेतले आहेत.