नव्या कृषी कायद्यामुळे रेशनचे धान्य बंद होण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:44 PM2021-02-08T15:44:09+5:302021-02-08T15:44:41+5:30

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या कायद्यामुळे रेशनचे धान्यही संकटात येण्याची भिती वर्तविली जात आहे.

Fear of ration grain closure due to new agriculture law | नव्या कृषी कायद्यामुळे रेशनचे धान्य बंद होण्याची भिती

नव्या कृषी कायद्यामुळे रेशनचे धान्य बंद होण्याची भिती

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : केंद्रीय कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या कायद्यामुळे रेशनचे धान्यही संकटात येण्याची भिती वर्तविली जात आहे.

केंद्र सरकारने तीन नवीनकृषी कायदे केले आहे. यानुसार खासगी कंपनी शेतकऱ्यांसोबत करार करतील. पिकांच्या लागवडीपासून खरेदीचे अधिकार संबंधित खासगी व्यापाऱ्याला असतली. साठवणुकीवर मर्यादा नसल्याने त्यांच्याकडबून मनमोकळेपणाने धान्याची साठवणूक होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात विदर्भ रास्त भाव दुकानदार केरोसीन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा क्याद्यातील बीपीएल, अंत्योदय प्राधान्य गटातील कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य वाटप केले जाते. सरकारच्या नवीन कायद्यामुळे अन्नसुरक्षा क्याद्याचे अस्तीत्व धोक्यात येईल. हे धान्य एएफसीआयच्या माध्यमातून मिळते. सर्व धान्.य खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी झाल्यास एफसीआयला धान्य मिळणार नाही. परिणामी रेशन दुकानात गहू, तांदूळ व इतर धान्य येणार नाही. त्यामुळे कालांतराने रेशनचे धान्यच बंद होईल. अशा परिस्थतीत गरीबांचे जगणे कठीण होईल. त्यामुळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांसोबतच गरीबांच्याही विरोधात असल्याचे संजय पाटील याांनी म्हटले आहे.

Web Title: Fear of ration grain closure due to new agriculture law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार