शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST

रामटेक/ सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा/ उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी आणखी ...

रामटेक/ सावनेर/काटोल/ कळमेश्वर/ मौदा/ नरखेड /कुही/ हिंगणा/ उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी आणखी ३३ रुग्णांचा जीव गेला तर २४४७ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत मृतांची संख्या १४१२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ७९,२१३ वर पोहोचली आहे. शनिवारी ११२४ रुग्ण बरे झाले. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६,१०८ इतकी आहे. कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळत नसल्याने ग्रामस्थात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावनेर तालुक्यात ३४२ रुग्णांची भर पडली तर ५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी सावनेर शहरात ८८ तर ग्रामीण भागात २५४ रुग्णांची नोंद झाली.

नरखेड तालुक्यात १८२ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १४ तर ग्रामीण भागातील १६८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५६८ तर शहरात २४१ इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत ६४, जलालखेडा (३५), मेंढला (२३) तर मोवाड येथे ४६ रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात शनिवारी १३५१ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत १४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. काटोल शहरात ७२ तर ग्रामीण भागात ७५ रुग्णांची नोंद झाली. कुही तालुक्यात ६२२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे १५, मांढळ (२२), वेलतुर (४१), साळवा(११) तर तितूर येथे १३ रुग्णांची नोंद झाली. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या २७४२ इतकी झाली आहे.

उमरेड तालुक्यात ९४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ६१ तर ग्रामीण भागातील ३३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कळमेश्वर तालुक्यात आणखी १८२ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात तेलकामठी येथे सर्वाधिक ३१ रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात १९८ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील २२ तर ग्रामीण भागातील १७६ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२२२ झाली आहे. यातील १८१९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅटिव्ह रुग्णांची संख्या २४०३ इतकी झाली आहे.

मौदा तालुक्यात ९५ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील बाधितांची संख्या २४०९ इतकी झाली आहे. यातील ११५१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२१२ इतकी आहे.

हिंगणा तालुक्यात पुन्हा १७२ बाधित

हिंगणा तालुक्यात शनिवारी १७२ रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक ६५ रुग्णांची नोंद वानाडोंगरी येथे झाली. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८८६३ झाली आहे. यातील ५६७८ रुग्ण बरे झाले आहेत तर १६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.